शरीर आणि मनं सुदृढ राहण्यासाठी चालणं म्हणजेच वॉक करणंही गरजेचं आहे. यामुळे अनेकजण नियमित चालण्याचा व्यायाम करतात. त्यातही काहीजण सुरुवातीपासूनच फिटनेसकडे लक्ष देत असल्याने वयाच्या साठीनंतरही फिट राहतात. पण काहीजण मात्र वाढत्या वयाचा,व्याधींचा मागचा पुढचा विचार न करता, डॉक्टरांचा सल्ला न घेता फिट राहण्यासाठी दररोज तास् न तास चालतात. त्यामुळे अशा व्यक्तींना चालल्यामुळे फायदा तर होत नाहीचं उलटं इतर त्रास मागे लागतात. यामुळे चालण्याचा व्यायाम हा कधीही मनाला वाटेल तसा न करता तज्त्रांच्या मार्गदर्शनाखाली करावा. त्यासाठी कोणत्या वयात किती वेळ चालावं ते समजून घेऊया.
6 ते 18 वर्ष
तज्ज्ञांनुसार ६ ते १७ वर्ष वयोमानापर्यंतचे तरुण जितके चालतील तितके त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. या वयातील तरुणांनी दररोज १५,००० पावलं चालावीत. तर या वयातील मुलींनी १२,००० पावलं चालणे फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
18 ते 40 वर्ष
या वयोगटातील स्त्री पुरुषांनी दररोज कमीत कमी १२, ००० पावलं चालावीत.
40 ते 50 वर्ष
प्रत्येक व्यक्तीला वयाच्या ४० नंतर काही ना काही शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे या वयातील व्यक्तींनी उगाचचं शरीराला त्रास न देता
११, ००० पावलं चालावीत.
तसेच ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे त्यांनी दिवसाला १०, ००० पावले चालणेही पुरेसे आहे.
60 ते 70 वर्ष
वयाच्या साठीनंतर उगाचचं जास्त चालण्याचा प्रयत्न करू नये. या वयात दिवसाला ८,००० पावलं चालणेही योग्य असते. तसेच चालताना थकवा वाटल्य़ास थांबावे.
80 ते 90
या वयात बऱ्याचजणांसाठी चालणे फिरणे कठीण असते. शरीर थकल्याने व्याधीही मागे लागलेल्या असतात. यामुळे या वयात झेपेल एवढेच चालणे, फिरणे करावे.