Dinvishesh 7 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..
Sarkarnama February 07, 2025 01:45 PM

१९७१ - स्वित्झर्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला

१९७७ - सोव्हिएट संघाच्या सोयुझ २४ या अंतराळयानाचे प्रक्षेपण

१९८१- बंगलोरमध्ये भीषण दुर्घटना. सर्कसचा खेळ सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत शाळकरी विद्यार्थ्यांसह शंभरहून अधिक जणांचा होरपळून मृत्यू

१९९१- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जाॅन मेजर यांच्या १० डाउनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासस्थात युद्धविषयक समितीची बैठक सुरू असताना आयरिश रिपब्लिकन आर्मीकडून निवासस्थानावर तीन माॅर्टर राॅकेटचा हल्ला झाला. सुदैवाना या स्फोटात कुणालाही दुखापत झाली नाही

१९९५ - काँग्रेस (आय) पक्षाच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेऊन माजी केंद्रीय मंत्री अर्जूनसिंग यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय

२००० - पद्म पुरस्कारासाठी संगीत क्षेत्रातील व्यक्तींना डावलण्यात येते असा आरोप करत जगप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांनी 'पद्मविभूषण' पुरस्कार नाकारला. आपल्यापेक्षा कमी साधना असणाऱ्या सतारवादकांना यापूर्वी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले याबद्दल व्यक्त केली होती नाराजी

२००१ - कच्छमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर केंद्र सरकारने आपत्कालीन व्यवस्थापन समिती स्थापन केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वा खालील या समितीचे उपाध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सोपविण्यात आले.

Next : भाजपने किती वेळा काबीज केली दिल्ली?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.