Shreyas Iyer : अर्ध्या रात्री आला फोन…! श्रेयस अय्यरचा दुसऱ्या वनडेतून पत्ता कट? नेमकं काय घडलं?
GH News February 07, 2025 06:12 PM

श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. या संधीचं श्रेयस अय्यरने सोनं केलं. त्याने 36 चेंडूत 59 धाव केल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. यावेळी त्याने 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मारले. हा सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने एक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडावर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. श्रेयस अय्यरने सांगितलं की, नागपूर वनडेत त्याला संघात स्थान मिळणं कठीण होतं. पण विराट कोहली अनफिट असल्याने जागा मिळाली. श्रेयस अय्यरने प्लेइंग 11 मध्ये कसं स्थान मिळालं याबाबतचा खुलासा देखील केला. श्रेयस अय्यरने सांगितलं की सामन्यापूर्वी चित्रपट पाहात होतो. श्रेयस अय्यरने सांगितलं की, ‘मी विचार करत होतो की थोडा आणखी काही वेळ चित्रपट पाहतो. पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा मला कॉल आला. त्याने मला सांगितलं की, कदाचित तू खेळू शकतो. कारण विराट कोहलीचा गुडघ्याला सूज आली आहे. यानंतर मी रुममधून पळालो आणि जाऊन लगेच झोपलो.’ श्रेयस अय्यरने हा खुलासा केल्यानंतर दुसऱ्या वनडेत जागा मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

श्रेयस अय्यरने खुलासा केल्यानंतर ही बाब स्पष्ट आहे की, तो टीम इंडियाच्या प्लान ए चा भाग नाही. म्हणजेच टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये त्याची जागा बनत नाही. त्यामुळे कटक येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेत अय्यरला खेळवणार की नाही असा प्रश्न आहे. अय्यरने अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे टीम इंडिया प्लान बीवर कायम राहते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने कमबॅक केलं तर टीम इंडियातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे टीम इंडिया यशस्वी जयस्वालला ड्रॉप करून गिलला ओपनिंगला पाठवणार का? तसेच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर अय्यरचा जागा संघात होईल, असं गणित क्रीडाप्रेमी मांडत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.