Akshay Kumar: अक्षय कुमारने विकला आलिशान अपार्टमेंट; ७८% पेक्षा जास्त झाला नफा, किती मिळाले पैसे?
Saam TV February 07, 2025 07:45 PM

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. शिवाय, तो सर्वाधिक कर देखील भरतो. २०२२ मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत अक्षय अव्वल स्थानावर होते. त्याने सुमारे २९.५ कोटी रुपये कर भरला होता. त्याच्याकडे अनेक मालमत्ता आहेत. आता एका वृत्तानुसार, त्याने अलीकडेच मुंबईतील बोरीवली येथील त्याचे आलिशान अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांना विकले आहे.

आणि यांच्याकडे केवळ भारतातच नाही तर परदेशातही अनेक मोठ्या प्रॉपर्टीस आहेत. इंडेक्सटॅपच्या नोंदणीनुसार, अभिनेत्याचे ६,८३० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले एक अपार्टमेंट वरळीतील ३६० वेस्ट टॉवरच्या बी विंगच्या ३९ व्या मजल्यावर होते. त्यात ४ पार्किंगची सुविधा होत्या. हे वरळी तील आलिशान अपार्टमेंट त्याने ३१ जानेवारी रोजी ते ८० कोटी रुपयांना विकले गेले. तसेच या व्यवहारासाठी ४.८ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली आहे.

अक्षय कुमारने ७८% नफा कमावला

स्क्वेअरगार्डच्या म्हणण्यानुसार, काही आठवड्यांपूर्वीच त्याने बोरिवली पूर्वेतील त्याचे अपार्टमेंट ४.२५ कोटी रुपयांना विकले. अभिनेत्याने २०१७ मध्ये हे अपार्टमेंट २.३७ कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि आता त्याला हे अपार्टमेंट विकल्यावर ७८ टक्के नफा झाला. सध्या तो जुहू येथील त्याच्या आलिशान समुद्रकिनारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि मुलांसह राहतो. २०२४ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्वही मिळाले, त्यानंतर ते आता कॅनेडियन नागरिकाऐवजी भारतीय नागरिक आहेत.

अक्षय कुमार चित्रपट

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा 'स्कायफोर्स' मध्ये वीर पहाडिया, निमरत कौर आणि सारा अली खानसोबत दिसला होता. याशिवाय तो 'वेलकम टू जंगल', 'हेरा फेरी ३' आणि 'भूत बांगला' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटांचे शूटिंग सध्या सुरु आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.