Sonu Sood: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदबद्दल काही काळापूर्वी बातमी आली होती की लुधियानातील न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली सोनू सूद विरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणावर आता सोनूने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मिडीयावर प्रकरण काय आहे ते सांगितले. याशिवाय, तो पुढे कठोर कारवाई करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
सोनू काय म्हणाला?
ने X वर लिहिले की, सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांबद्दल मला आता स्पष्टीकरण द्यावे लागेल. मला एक केससाठी माननीय न्यायालयाने साक्षीदार म्हणून बोलावले होते. माझा त्याकेसशी काहीही संबंध नाही किंवा मी कोणाचा ब्रँड अॅम्बेसेडर नाही. माझे वकिल १० फेब्रुवारी रोजी आम्ही एक निवेदन जारी करून हे स्पष्ट करतील की या प्रकरणात आमचा कोणताही सहभाग नाही.
सोनू कारवाई करणार
सोनूने पुढे लिहिले की, आम्ही ब्रँड अॅम्बेसेडर नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी संबंधित नाही. हा टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. सेलिब्रिटींना सॉफ्ट टार्गेट बनवले जाते हे खूप दुःखद आहे. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाई करू.
लुधियाना ने आपल्या आदेशात मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याला सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले. सोनूच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी त्याचा 'फतेह' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या, सोनूने त्याच्या आगामी प्रकल्पांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.