सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या धनंजय मुंडे विरोधात निवडणूक आयोगाला आज लिहिणार पत्र
ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरतेवेळी माहिती लपवली असल्याबाबत करणार निवडणूक आयोगाला तक्रार
ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरताना माहिती लपवल्यामुळे आमदारकी रद्द करण्याची दमानिया करणार पत्राद्वारे मागणी
कालच घरगुती हिंसाचार प्रकरणी वांद्रे कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडेंना ठरवले होते दोषी
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान होणारएकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सन्मान होणार
११ फेब्रुवारीत दिल्लीत होणार सन्मान
महादजी शिंदे पुरस्कार देऊन होणार सत्कार
राज्यपाल गोदावरी जन्मोत्सव सोहळ्यासाठी कार्यक्रम स्थळी पोहचले- गोदावरीचा आज जन्मदिन, रामकुंडावर गोदावरी जन्मोत्सव सोहळा
- रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून गोदावरी जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन
- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पद्मश्री महेश शर्मा यांना राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्यात येणार
- तर गोदावरी जन्मोत्सवानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आज गोदावरीची थोड्याच वेळात विशेष महाआरती
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीवर्षभरापूर्वी झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता;आज स्वतःहून पोलीस आयुक्त कार्यालयात शरण आले.
अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमेचा सुमारे ९७.४१ कोटींच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे.
तेंव्हापासून पोलिसांना चकमा देणारे काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य तथा बँकेचे अध्यक्ष संशयीत सुभाष झांबड हे अखेर आज पोलीस आयुक्तालयात शरण आले आहे.
बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना झांबड चकवा देत होते. दोन वेळेस त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता मात्र तो देखील कोर्टाने फेटाळला होता.
दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे करत आहे.
धाराशिवमध्ये कर्मचाऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर कामबंद आंदोलनधाराशिव च्या परंडा तालुक्यातील खासगाव येथील शेतकऱ्याच्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली असे म्हणत परंडा तहसिल कार्यालयातील महसुल सहाय्यक जगन्नाथ खुने यांना आरोपी जरीचंद गोडगे यांनी दमदाटी करुन मारहान केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून जो पर्यंत मारहान करणाऱ्यावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महसुल कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
उद्यापासून शिर्डीत दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय सहकार परिषदशिर्डीत 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच आयोजन करण्यात आलय.. परिषदेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि नागपुर येथून निघालेल्या सहकार दिंड्यांचे राहाता शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलय.
मुंबई येथुन वैकुंठभाई मेहता तर नागपुर येथून धनंजय गाडगीळ यांच्या नावाने सहकार दिंड्या काढण्यात आल्या होत्या.
सहकाराची मुहुर्तमेढ रोवणा-या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रवरानगर येथील स्मृतीस्थळी या दोन्ही दिंड्यांचा मिलाफ झाला.
त्यानंतर दिंड्यांचे प्रस्थान शिर्डीकडे झाले.. दरम्यान राहाता शहरात दिंड्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलय. ढोल ताशांचा गजर, उंट - घोडे अशी भव्य शोभा मिरवणुक पार पडली.
अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलनपुण्यातील राजगड तालुक्यात अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन
वेल्हा पंचायत समिती समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत राहुल सोलापूरकर याच्या प्रतिमेला जोडे मारून केले आंदोलन
सोलापूरकर यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी
अशोक मोहिते हल्ला प्रकरण; आरोपी वैजनाथ बांगरला पाच दिवसांची पोलीस कोठडीधारूर येथील अशोक मोहिते हल्ला प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
धारूर पोलिसांच्या पथकातून कर्नाटक मधून केली होती अटक
चौकशीत अनेक बाबी समोर येणार
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेशी संबंधित माहिती देखील समोर येणार
फोनवर बोलत दुचाकी चलवत असल्याने रोखले म्हणून थेट पोलिसाच्या डोक्यात दगड घातला- पुण्यात पुन्हा पोलिसावर हल्ला झाला आहे.
- फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला.
- राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
- फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला.
- राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला.
- आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात आत्महत्या.पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाची लोणावळ्यात आत्महत्या
टायगर पॉईंट परिसरात शिवलिंग पॉइंटवर आत्महत्या केली आहे.
अण्णा गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव
पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते.
५ हजारांची लाच घेतांना भूमिअभिलेखचा उपअधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यातशहादा भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाने मागितली १० हजारांची लाच.
५ हजारांची लाच घेतांना लाचखोर उपअधीक्षककाला रंगेहाथ पकडले.
शेत मोजणीच्या शीटसाठी ७४ वर्षीय शेतकऱ्याकडून मागितली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत केली कारवाई.
भू-कर माफक उपअधीक्षक अभिजीत वळवी विरोधात गुन्हा दाखल.
सोलापुरात मातोश्री रमाई जयंतीच्या निघाल्या भव्यदिव्य मिरवणुका..त्यागमूर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जातीय.
रमाईच्या १२७ व्या जयंती निमित्त सोलापुरात भव्यदिव्य मिरवणुका निघाल्याच चित्र दिसून येत आहे. जवळपास 35 ते 40 मंडळानी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला आहे.
मातोश्री रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास उलगडून दाखवणारे देखावे या मिरवणुकीत सकरण्यात आले आहेत.
या मिरवणूकांसाठी सोलापूर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
या सर्व जयंती मिरवणुकीत बाबासाहेब आणि रमाईचा सोलापूर जिल्ह्यात घडलेला शिकरीचा प्रसंग आणि हरणाच्या पाडसाचा प्रसंग उलगडून दाखवला आहे.
अहिल्यानगर शहरातील एकवीरा चौक येथे स्कॉर्पिओ गाडीला लागली आगएकवीरा चौक येथे स्कॉर्पिओ गाडीला लागली आग
सुदैवाने चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने गाडीतून घेतली बाहेर उडी.
संपूर्ण स्कार्पिओ गाडी जळून खाक.
आग लागण्याचे करण अद्याप कळले नाही.
उल्हासनगरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडल्या!उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या २ रिक्षा पकडल्या आहेत. यातला १ नंबर ओरिजनल, तर दुसरा डुप्लिकेट आहे. आपल्याला दंड होऊ नये, म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षाचालकानं दिली आहे.
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे वाघनखांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन केलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले आहे.
याच निमित्याने निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचा आयोजन सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे.
थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित असतील.
या कार्यक्रमाला अनेक शाळेमधून आलेले विद्यार्थी हे उपस्थित आहे.
Pune : आमदार रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीलापुण्यातील विधानभवनात रोहित पाटील दाखल
आज अजित पवारांच्या उपस्थित पार पडत आहे पुणे विभागातल्या जिल्ह्यांची बैठक
या बैठकीला पुणे विभागातील मंत्री आहेत उपस्थित
बैठकीसाठी आलो असल्याची रोहित पाटलांकडून माहिती
Pune Dive Ghat: पुण्याजवळ असलेला दिवेघाट डोंगरात पेटला वणवादिवे घाटातील पेटलेला वनवा विजवण्यासाठी फुरसुंगीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे आणि नागरिक करत आहेत प्रयत्न.
दिवेघाटात वाळलेलं गवत अज्ञातांनी काडी टाकून पेटवल आहे.
या वणव्यात शेकडो पशु पक्ष्यांचे घरटे जळून होत आहेत खाक.
परंतु आग आणि उन्हाची तमा न बाळगता पोलीस निरीक्षक मंगल मोढवे आणि नागरिक करत आहेत वनवा विजवण्याचा प्रयत्न.
Navi Mumbai: कळंबोली येथील अंगणवाडीतील शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्याकळंबोली येथील अंगणवाडी क्रमांक 55 येथील घटना.
बालकांना पोषण आहारात रव्या पासून तयार करण्यात आलेल्या उपीटच वाटप करण्यात आलं होत.
रव्याच्या उपीट मध्ये आढळल्या अळ्या.
बालिकेच्या आहारातील अळ्या पालकांच्या निदर्शनास आल्याने प्रकार उघडकीस.
पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली तक्रार.
अधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले आदेश.
Solapur: शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीसाठी लिपिकाने घेतली २० हजारांची लाचवेतन श्रेणीच्या फाईलवर शिक्षणाधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. घनश्याम अंकुश मस्के असे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार शिक्षकाची सेवा २४ वर्षे पूर्ण झाली तरी निवड श्रेणीचा प्रस्ताव मान्यतेसाठी २५ ऑक्टोबर २०२३ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर केला होता.
तक्रारदार शिक्षक वारंवार पाठपुरावा करत होता.निवड श्रेणी मान्यतेसाठी आरोपीने सुरुवातील पाच हजार स्वीकारले.
३० हजार दिल्यानंतर मान्यतेसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले होते.
Pune: पुण्यात आंबेडकरी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाची मागणी
पुण्यातील डॉ. आंबेडकर भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
राज्यातील विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर
Jalgaon: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरातील चार घरांना आगआगीत झोपडपट्टी परिसरातील एकाच रांगेतील चारही घर जळून खाक...
सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही...
दोन तासानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश....
संसार उपयोगी वस्तू ,पैसे, महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाल्याने नागरिकांनी फोडला टाहो
संपूर्ण घर जळून खाक झाल्याने नागरिकांना अश्रू अनावर
शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचा नागरिकांचा आरोप
घटनास्थळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाची प्रशासन दाखल
प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू....
Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर जवळच्या करकंब येथील हाॅटेल ग्रॅन्डचे उद्घाटनउद्घाटना नंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना..
बंद खोलीत फक्त सर्व पक्षीय नेत्यांची राज ठाकरे यांनी घेतली औपचारिक भेट..
मात्र मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद न साधताच ठाकरे मुंबईला रवाना...
Solapur: सोलापूरमध्ये अतिक्रमण विभागाकडून शहरात ठिकठिकाणी मोठी कारवाईसोलापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या तक्रारी महानगरपालिकेत वाढल्यानंतर महानगरपालिका अतिक्रमण विभाग तसेच वाहतूक शाखा अंतर्गत पोलीस अधिकारी यांच्यावतीने संयुक्तपणे अतिक्रमण मुक्त कारवाई शहरात ठीक-ठिकाणी करण्यात आली.
बेगम पेठ बाजार, विजापूर वेस, या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
अतिक्रमण काढताना काही व्यापारी अतिक्रमण काढण्यास विरोध देखील केले मात्र त्यांना न जुमानता ही कारवाई करण्यात आली.
वारंवार वाहतुकीस अडथळा अतिक्रमांची कारवाई झाल्यानंतर हे रस्ते मोकळा श्वास घेत असल्याचं पहायला मिळत आहे.
कळंबा कारागृह इथून मटका किंग सम्राट कोराने याला कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यातमुक्कांतर्गत कारवाई चुकवण्यासाठी गेली 6 वर्षे फरार असलेला मटका किंग सम्राट कोराणे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
काल सम्राट कोराणे न्यायालयात झाला होता स्वतः हजर
पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई चुकवण्यासाठी सम्राट कोराने गेल्या सहा वर्षापासून होता फरार
गेली सहा वर्ष सम्राट कोराणे याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांच्याकडे शरण गेला त्यांची चौकशी होण्याची शक्यता
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर- राज्यपालांच्या हस्ते आज रामकुंडावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या राष्ट्रजीवन पुरस्कारांचं वितरण
- गोदावरी जन्मोत्सवानिमित्त संध्याकाळी राज्यपालांच्या हस्ते गोदावरीची विशेष आरती
- राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडावर प्रशासनाकडून गोदा स्वच्छता आणि साफसफाईला सुरुवात
- तर राज्यपालांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रामकुंडकडे जाणारे रस्ते दुपारी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत राहणार बंद
- रामकुंड परिसरात पोलिसांचा देखील राहणार मोठा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेत 21 कोटीचा एफडी घोटाळाकाँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबडसह 68 जनाविरुद्ध गुन्हा दाखल
एफडी धारकांचे पैसे परस्पर दुसऱ्यांच्या कर्ज खात्यात वळविण्याचा आरोप
अजिंठा अर्बन बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सन 2006 ते 2023 या काळात अपहार करण्यात आला होता
नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक- नाशिकच्या दिंडोरी रोडवरील नामवंत बिल्डरच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार आणि दगडफेक झाल्याची माहिती.
- अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार करून पळ काढला
- दोन दिवसांपूर्वीच घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड
- या हल्ल्यांमागील कारण अद्याप स्पष्ट नाही, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- म्हसरूळ पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू
Nashik: नाशिकच्या रामकुंडवरील प्राचीन गोदावरी मंदिरात आज गंगा गोदावरी जन्मोत्सव- थोड्याच वेळात साजरा होणार गोदावरी जन्म सोहळा
- सोहळ्याला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सपत्नीक उपस्थित
- पुरोहित संघाच्या वतीने वेद मंत्रांच्या घोषात जन्म सोहळा सुरू
Subhash Zambad: काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झाबंड यांना अटकअजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झाबंड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता.
आज त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
21 जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता तेव्हापासूनच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंढरपुरात दाखलराज ठाकरे यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेलचे उद्घाटन
राज ठाकरे यांच्या सोबतीने हॉटेल उद्घाटनास आ.अभिजीत पाटील , शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी सावंत यांची उपस्थिती
राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसे पदाधिकारी यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी , शिवसेना शिंदे गटाचेही आमदार अन् पदाधिकारी उपस्थित
उद्घाटना नंतर राज ठाकरे घेणार पदाधिकारी यांच्या गाठीभेटी...
Pune: पुण्यात भाजपचे ग्रामीण आमदार आणि पदाधिकारी यांची बैठकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे संपर्क मंत्री पद स्विकारल्यानंतर ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बोलवली बैठक......
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक....
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकारी राहणाऱ्या बैठकीला उपस्थित...
राज्यमंत्री माधुरी मिसाळ,आमदार भीमराव तापकीर यांच्यासह पदाधिकारी बैठकीला दाखल....
थोड्याच वेळात मंत्री चंद्रकांत पाटील पोहोचणार सर्किट हाऊसवर त्यापूर्वी कार्यकर्ते जमायला झाली सुरुवात...
Pune News: पुण्यातील बोपदेव घाटात पीएमपी बसचा अपघातबोपदेव घाटात कंटेनर आणि पीएमपी बसची जोरदार धडक
सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी नाही मात्र २ जण गंभीर जखमी
आज सकाळी ६ च्या सुमारास घाटात घडला अपघात
कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल
बोपदेव घाटात वळणावर कंटेनरचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती
Sangli: चार वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण जत तालुका बंदसांगलीमध्ये जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षे मुलीची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण जत बंद ठेवण्यात आलेला आहे.
घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून आज या घटनेच्या निषेधार्थ जत शहर बंद ठेवून करण्यात आला आहे.
तर दुपारी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाच्या आयोजन ही करण्यात आले आहे.
जतमध्ये करजगी या गावांमध्ये चार वर्षे लहान मुलीचे निर्गुण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रात्री उशिरा शवविच्छेदन सुरू होते. या लहान मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय असल्याने त्या दृष्टीने तपास पोलीस करत आहेत.
मुंडे विरोधातील बातम्या का पाहतोस म्हणून मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना कर्नाटकातून अटक; आज न्यायालयात करणार हजरअशोक मोहितेला मारहाण करणारा अभिषेक सानप अल्पवयीन बाल न्यायालयात हजर करण्यात येणार....
अभिषेक सानप 17 वर्षे वय पूर्ण धारूर पोलिसांची माहिती
दोन वाजता धारूरच्या तालुका न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार....
आरोपी वैजनाथ बांगरला धारूर तालुका न्यायालयात तर अल्पवयीन आरोपी अभिषेक सानपला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार
दोन वाजता धारूरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार....
गुजरात राज्याच्या बसमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करीगुजरातच्या बसमधून आणलेला गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला....
गुटखा तस्करीसाठी गुजरात राज्याच्या बसेस केला जातोय वापर....
गुजरात बस चालक आणि वाहक गुटखा तस्करी करत असल्याच्या संशय.......
गोदरा शिर्डी बस मध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक.....
नवापूर गुजरात राज्यातील बसमधून गुटखा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडला....
बसची तपासणी करत 4 लाख 41 हजारांचा गुटखा जप्त......
गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नवापूर चेक पोस्ट जवळ सापडा रचत केली कारवाही.....
आरोपी रज्जाक अजीज लखनी रा नवापूर याला ताब्यात घेत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचे लागण, एक अकरा वर्षीय बालिका पॉझिटिव्ह- नंदुरबार जिल्ह्यात जीबीएस चे लागण असलेल्या रुग्ण आढळून आला होता....
- दोन रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, यातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह एकाच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे.....
- एकाच्या अहवाल निगेटिव्ह आला असल्याने सध्या जिल्ह्यात एक अकरा वर्षीय बालिका पॉझिटिव्ह आहे.....
- पॉझिटिव्ह असलेली बालिकेवर उपचार केले जात आहेत.....
- निगेटिव्ह आलेल्या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे...
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक बैठकीचं आयोजनमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री प्रकाश अबिटकर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बैठकीला उपस्थित राहणार
दुपारी बारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होणार बैठक
Pune: पुणे महानगरपालिका चांदणी चौकात उभारणार छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य पुतळाचांदणी चौकात उभारण्यात येणार महाराजांचा ६० फुटी पुतळा
चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्गालगत महापालिकेतर्फे उभरण्यात येणार हिंदवी स्वराज्यनिर्मिती शिल्प
या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिका करणार ७ कोटी साठ ६० रुपयांचा खर्च
प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
प्रकल्पाचा आराखडा देखील महानगरपालिकेकडून तयार
अंतरवाली सराटीमधील उपोषण स्थळ हटवले, मंडप आणि स्टेजदेखील काढलेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीत आतापर्यंत जवळपास सातवेळा आमरण उपोषण केल आहे .
मात्र सातव आमरण उपोषण सोडताना मनोज जरांगे यांनी पुढे आता उपोषणाची लढाई लढायची नाही
तर समोरासमोर लढायच अशी घोषणा केल्यानंतर ग्रामस्थांनी अंतरवाली सराटीमधील उपोषण स्थळ हटवलं असून स्टेज आणि मंडप काढण्याचे काम सुरू आहे..
इंदूर शहरातील स्वच्छतेच्या व्यवस्थापनाची पुणे महापालिका आयुक्तांकडून पाहणीपुणे महापालिका आयुक्त यांच्यासोबत कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने उपस्थितीत
पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि इंदूर महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिलाश मिश्रा यांच्यात चर्चा
इंदूर स्वच्छता मॉडेल पुण्यात कसे वापरले जाऊ शकते यावर चर्चा
स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत ३०० जणांच्या शिष्टमंडळाकडून आज इंदूर शहराची पाहणी
कचरा गोळा करणे, कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि वर्गीकरण यासारख्या गोष्टींचा आढावा
पुणे महापालिकेच्या ३०० सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा दौऱ्यात समावे
बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या, भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात दाखल करणार जनहित याचिकाबिबट्यांना मारण्याची परवानगी द्या...
भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात दाखल करणार जनहित याचिका...
संगमनेर आणि राहाता तालुक्यात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांचा संदर्भ देत दाखल करणार याचिका...
बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही...
बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली...
बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका दाखल करणार...
सुजय विखे यांची माहिती...
कायदेशीर कारवाईची सुरुवात अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी, त्यांना माफी नाही, शिवेंद्रराजे भोसले यांची मागणीछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्रात पेटविण्याचा उद्योग करत आहेत..
त्याची उतरती काळा सुरू झाली असेल किंवा त्याचे भवितव्य विझायला लागले असले यामुळे प्रकाश झोतात येण्यासाठी छ. शिवाजी महाराज किंवा छ. संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं की आपल नाव होते..
त्यामुळे त्यांना माफी नाही, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारंने कारवाई लवकरात लवकर करावी आणि याची सुरुवात राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी अशी मागणी शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
Sangli: शक्तीपीठ रद्दसाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्तांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्रनागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्गाचे विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्व्हे प्रक्रिया त्वरित थांबवावी, सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
सांगलीवाडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द कराण्यासाठी पत्रे लिहिले आहेत.
राज्य सरकारने हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत, आज शेतकरी आपल्या रक्ताने पत्र लिहितोय, मात्र यापुढील काळात राज्यकर्त्यांचा रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आला आहे.
Ambernath: अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये २४ तासात ४ चोऱ्या, पाण्याचे मीटर, पाईपलाईन आणि नळ चोरलेशिवगंगा नगरमधील शिवदर्शन अपार्टमेंटमधील सर्व नळ आणि पाईप, शिवश्रद्धा इमारतीतील पाण्याचे ९ मीटर, शिव बिल्डिंगमधील पाण्याचे मीटर आणि पाण्याची पाईपलाईन, तसंच हरिदर्शन इमारतीतील ड्रॉवर या चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी रहिवाशांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे शिवगंगा नगरच्या समोरच पोलीस चौकी असूनही चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
Amol Mitkari: अमोल मिटकरींनी केलं रात्री उशिरा 'स्टिंग ऑपरेशन', स्टिंगमध्ये बेघर केंद्रात अनेक अनियमितताअकोल्यातल्या मातानगरात तत्कालिन पालकमंत्री बच्चू कडूंच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलंय.
या ठिकाणी भिकारी आणि घर नसलेल्या अनाथ नागरिकांची व्यवस्था करण्यात आलीय.
आमदार मिटकरींच्या या स्टिंगमध्ये या केंद्रातील अनेक अनियमितता समोर आल्यायेत.
अकोला महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या केंद्रासाठी तेंव्हा 4.50 कोटींचा निधी शासनाकडून देण्यात आला होताय.
मात्र, आमदार मिटकरींनी अकोल्यातील याच 'संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील अव्यवस्था एका 'स्टिंग ऑपरेशन'मधून समोर आणलीय.
विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ नगरसेवकाविरुद्ध कारवाईचा ठरावविरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवका विरुद्ध कारवाईचा ठराव करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात देहू नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी प्रचार केला होता.
देहू नगरपंचायतीच्या नगरसेवकांवर विरोधी पक्षाचे उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत बजावलेल्या सूचना पत्रानुसार गटाच्या बैठकीत कारवाईचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
तर या बैठकीत नगरसेवक प्रवीण काळोखे, सपना मोरे आणि मीना कुऱ्हाडे या तीन नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वरिष्ठांकडे ठराव पाठवण्यात येणार असल्याची माहिती गटनेते योगेश परंडवाल यांनी दिली.
Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात रात्री अकरा वाजता दुकानांना भीषण आगया आगीत कुदळवाडी परिसरातील तीन दुकान पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
जळालेल्या दुकानांमध्ये एक फुटवेअर शॉप आणि दोन रेडिमेट कपड्यांचे शॉपचं समावेश आहे.
आग लागल्याची वर्दी मिळताच, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे.
या आगित जीवित हानी झाली नसली तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमध्ये दुकानाला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
Raigad Politics: रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायमरायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याने जिल्हा नियोजन समिती गठीत झालेली नाही.
त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही.
नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलं.
मात्र याचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय.
स्वतंत्र बैठक घेवून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला जाईल. रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात शासन योग्य निर्णय करेल असही त्यांनी सांगितलंय.
पालकमंत्री पदाचा कुठलाही तिढा नाही. काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासारव राहुल नार्वेकर यांनी केलीय.