सोशल मिडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'कोकण हार्टेड गर्ल'च्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' मधून अंकिता वालावलकरला खूप लोकप्रियता मिळाली आहे. अंकिताच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. अंकिता संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे.
भगत आजवर अनेक गाजलेली गाणी संगीतबद्ध केली आहे. मात्र अद्यापही अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तारीख समोर आली नाही आहे. अशात नुकताच अंकिताने आपल्या प्री वेडिंगची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अंकिता आणि कुणालच्या प्री वेडिंग शूटचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. अंकिताने समुद्रकिनारी रोमँटिक शूट केले आहे. तिने प्री वेडिंगची झलक दाखवणारा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दोघे खेळताना आणि एकमेकांचा हात हातात घेऊन समुद्रकिनारी चालताना आणि बोटीतून फिरताना दिसत आहेत. हे रोमँटिक फोटोशूट सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पार पडले आहे. व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग"
प्री वेडिंग व्हिडीओमध्ये कोकणाचे सुंदर सौंदर्य अनुभवता येत आहे. निळाशार समुद्र किनारा आणि नारळाच्या बागा पाहायला मिळत आहे. अंकिता आणि कुणाल देखील एकमेकांत मग्न पाहायला मिळत आहेत. अंकिता आणि कुणालचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.