नागपूर
- वाडी पोलिसात कार्यरत हवालदाराची आर्थिक तणावातून राहत्या घरी केली आत्महत्त्या
- हेमराज ज्ञानेश्वर जीचकर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव..
- प्लॉट खरेदी केला असतांना रजिस्ट्री जवळ येऊन पैश्याची जुळवा जुळव होत नसल्याने होता आर्थिक तणावात
- शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना घरात पत्नी मुलगा, मुलगी, बाहेर गेले असतांना घरात गळफास घेऊन आत्महत्या.
- वाडी पोलिसात कार्यरत असून घर गिट्टीखदान पोलिसात घर असल्यानं घटनेची नोंद करण्यात आली..
Maharashtra Live Update : उद्धव ठाकरे संपले असे समजू नका, खासदार संजय जाधवांनी कुणीही उबाठा सोडून जाणार नसल्याचे केले स्पष्ट
आम्ही त्यांच्याकडे जाणार असल्याचा संभ्रम निर्माण केला जातोय मात्र असा कुठलाही संभ्रम नाही आम्ही नऊ जण कुठेही जाणार नाहीत आणि यांनी उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत याचा अर्थ ते संपले असं नाही होत बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे जनाधार आहे लक्षात ठेवा विनाकारण संभ्रम निर्माण करून गढूळ राजकारण करू नका आम्ही कुणीही कुठे जाणार नाहीत असे परभणीतील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे. खासदार फुटी बाबत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याबाबत हे विधान केलं आहे.