दिल्ली निवडणुकीची मतमोजणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे आणि आम आदमी पक्ष खूप मागे आहे.
Anna Hajare : या कारणांमुळे दिल्लीत 'आप'चा पराभव; अण्णा हजारेंनी सांगितलं कारणदारु घोटाळ्यामुळे 'आप'चा पराभव, आचार विचार महत्त्वाचे हे 'आप'चे नेते विसरले, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
PM Modi live : दिल्लीत भाजप विजयाचा गुलाल उधळणारदिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७:३० वाजता भाजप मुख्यालयाला भेट देतील.
Delhi Voting result live : दिल्लीत भाजपची मुसंडी, 40 जागांवर आघाडीदिल्लीतील विधानसभा मतमोजणीचे कल हाती येण्यास सुरुवात झालीये. यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. तर आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजप 40 जागी आघाडीवर आहे.
दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवरनवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या 6 व्या फेरीनंतर अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर
Ramesh Bidhuri : AAP चा पर्दाफाश झालाय, दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल', भाजप नेते रमेश बिधुरी म्हणालेदिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असे भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले आहेत.
Delhi Election live : दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल 343 मतांनी आघाडीवरनवी दिल्ली निवडणूक निकालासाठी मोजण्यात आलेल्या 3 फेऱ्यांच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल 343 मतांनी पुढे आहेत.
अरविंद केजरीवाल (आप) 6442 ६४४२
प्रवेश वर्मा (भाजप) 6099
संदीप दीक्षित (काँग्रेस) 1092
Aap Party Leader : आतिशी पिछाडीवर तर मनीष सिसोदिया आघाडीवरदिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीत कालकाजी येथून आतिशी पिछाडीवर तर जंगपुरा येथून मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत.
Arvind Kejriwal : दुसऱ्या फेरीत अरविंद केजरीवाल आघाडीवरदिल्ली विधानसभेच्या मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत.
Delhi Election result 2025 live : कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार आघाडीवर?रिठाला मतदारसंघातून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर
बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन आघाडीवर
ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर
मोती नगरमधून भाजपचे सतीश खुराणा आघाडीवर.
ग्रेटर कैलाशमधून आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर
शकूर बस्तीमधून आपचे सत्येंद्र जैन आघाडीवर.
राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर.
करावलनगर मतदारसंघातून भाजपचे कपिल शर्मा आघाडीवर.
बिजवासन मतदारसंघातून भाजपचे कैलाश गेहलोत आघाडीवर.
रोहिणी मतदारसंघातून भाजपचे बिजेंद्र गुप्ता आघाडीवर.
चांदणी चौकातून भाजपचे सतीश जैन आघाडीवर.
Delhi Assembly result 2025 live : केजरीवाल 1500 मतांनी पिछाडीवरदिल्ली विधानसभेच्या ईव्हीएमच्या मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे. तर भाजप आघाडीवर आहे. केजरीवाल 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. तर तिकडे भाजप 43 जागांवर पुढे आहे.
Delhi Assembly result 2025 live : केजरीवालांसह आपचे अनेक दिग्गज पिछाडीवरदिल्ली निवडणुकीचा निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, आतापर्यंतचा निकाल सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी धक्कादायक असा आहे. कारण आपचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. त्यामध्ये नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, जंगपुरामधून मनीष सिसोदिया आणि कालकाजीमधून आतिशी पिछाडीवर आहेत.
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्लीत भाजप 42 जागांवर आघाडीवरमतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 42 जागांवर पुढे आहे. तर आप त्यापाठोपाठ 27 जांगावर आघाडीवर आहे.
Delhi Election result 2025 live : भाजपची आतापर्यंत 36 जागांवर आघाडीदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाजप 36 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 28 जागांवर आघाडीवर आहे.
Navi Delhi Election result 2025 live : भाजप-आपमध्ये चढाओढदिल्लीतील विधानसभा मतमोजणीचे सुरूवातीचा कल भारतीय जनता पक्षासाठी चांगला असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे. भाजपने 20 तर आपने 17 जागांवर आघाडी घेतली आहे.
Navi Delhi Election result 2025 live : भाजप, आप 12 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसने खातं उघडलंदिल्लीत भारतीय जनता पक्षाने एक्झिट पोलने अंदाज वर्तवल्यानुसार सुरूवातीपासून जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसर भाजप सध्या 12 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष देखील 12 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, काँग्रेसचा केवळ एक उमेदवार आघाडीवर आहे.
Delhi Vidhan Sabha result 2025 live : भाजप 12 जागांवर आघाडीवर तर केजरीवाल पिछाडीवरदिल्ली विधानसभेची मतमोजणी सुरू झाली असून सुरूवातीच्या कलानुसार आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी या देखील पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे भाजपने मात्र, सुरूवातीपासून जोरदार मुसंडी मारली आहे. त्यानुसार भाजप आता 12 जागांवर आघाडीवर आहे.
Delhi Assembly election 2025 news LIVE : मतमोजणीच्या सुरूवातीलाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी पिछाडीवरदिल्लीत मतमोजणीला सुरूवात झाली असून मतमोजणीच्या सुरूवातीलाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी पिछाडीवर आहेत.
Delhi Election result 2025 News live : पोस्टल मतमोजणीत भाजप 6 जागांवर आघाडीवरदिल्लीत विधानसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतजमोजणीला आता सुरुवात झाली आहे. सुरूवातीला पोस्टल मतमोजणी सुरू असून यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे.
Delhi Election result 2025 live : 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणीदिल्ली विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. या मतमोजणी 8 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे.
Assembly election vote counting live : देशाची राजधानीत सत्ता कोणाची? आज जाहीर होणारदिल्ली विधानसभ निवडणुकीचा निकाल आज (8 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजप आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अखेर देशाच्या राजधानी नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता आज संपणार आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष जिंकला तर या ते सलग तिसऱ्यांचा दिल्लीचं तख्त आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरतील. मात्र, यंदा दिल्लीत सत्तांतर होईल असे अनेक संस्थांच्या एक्झिट पोल्सचे अंदाज आहेत. त्यामुळे भाजप, आप की काँग्रेस दिल्लीत सत्ता कोणाची याचा फैसला आता थोड्याच वेळात होणार आहे.