Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या निमित्ताने चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन सुरु आहे. विकी आणि अन्य कलाकार अनेक मुलाखतींमध्ये चित्रपटाशी निगडित विविध किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. पण आता लवकरच विकी कौशल एका मराठी मालिकेत हजेरी लावणार आहे.
'छावा' चित्रपटाच्या प्रोमोशनचा भाग म्ह्णून अभिनेता विकी कौशल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत विशेष अतिथी म्ह्णून हजेरी कावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे. विकी हा मुंबईतील मालाड येथील चाळीत जन्माला आला आणि तिथेच तो मोठा झाला त्यामुळे त्याच्यामानात मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विशेष प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे त्याचे या मराठी मालिकेत हजेरी लावणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
राजश्री मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती प्रेक्षकांना देत, 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या सेटवर विक्की कौशलने लावली खास हजेरी!' हे कॅप्शनमध्ये लिहिले. या पोस्टवर चाहत्यांच्या अनके कौतुकास्पद कमेंट येत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले 'सुपरहिट कॅमिओ' दुसऱ्याने लिहिले 'सुपर' अशा विविध प्रेमळ कमेंट पाहायला मिळत आहेत.
चा 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. तर अक्षय खन्ना क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, स्टार प्रवाह वाहिनीवर '' ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होते.