महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस या उत्तम गायिका आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. नुकतेच त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
फडणवीस यांच्या नवीन गाण्याचे नाव मारो देव बापू सेवालाल' (Maro Dev Bapu Sevalal) असे आहे. या गाण्यात अमृता फडणवीस बंजारा पोशाखात पाहायला मिळत आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी लूक केला आहे. या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहे. तर संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे.
अमृता फडणवीस या कायमच आपली कला जपताना पाहायला मिळतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे इन्स्टाग्राम 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमृता फडणवीस या एक आघाडीच्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. अमृता फडणवीस यांनी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस देखील खूप उत्तम गाते. माय-लेक आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अमृता फडणवीस यांच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.