निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रथिने सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व मानले जाते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी कडधान्य प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. भारतीय जेवणामध्ये कडधान्यांना विशेष स्थान आहे. कारण ते केवळ प्रथिनांनी समृद्ध नसून तर फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा देखील चांगला स्त्रोत आहे. पण जेव्हा सर्वाधिक प्रथिने असलेल्या डाळींचा विचार केला जातो तेव्हा लोकांमध्ये अनेकदा गोंधळ उडतो. मूग, मसूर की हरभरा डाळ यापैकी सर्वात फायदेशीर डाळ कोणती आहे ते अनेकांना माहिती नाही. या तीन पैकी कोणत्या डाळीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन कोणत्या डाळीमध्ये असते आणि कोणती डाळ तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊ.
100 ग्राम मूग डाळीमध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रथिने आढळतात. मुगाची डाळ भारतीय घरांमध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. कारण ती हलकी सहज पचणारी असते. जे लोक डायटिंग करत आहेत किंवा वजन कमी करत आहे त्यांच्यासाठी मुगडाळ हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय या मध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात.
शंभर ग्राम मसूर डाळीमध्ये सुमारे 25 ग्राम प्रथिने आढळतात. मसूर डाळमध्ये प्रथिन्यांसह, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. अशक्तपणा आणि रक्ताची कमी असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते. मसूर डाळ हृदयाच्या आरोग्यासाठी ही चांगली मानली जाते. कारण त्यात असलेले अँटिऑक्सिडेंट आणि फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
100 ग्रॅम हरभरा डाळीमध्ये सुमारे 22 ग्राम प्रोटीन असते. हरभरा डाळ ही सर्वात जास्त प्रथिनेयुक्त मानली जाते. ज्यांना स्नायू संबंधित त्रास असेल किंवा त्यांचे शरीर मजबूत करायचे आहे त्यांच्यासाठी हि डाळ सर्वोत्तम मानली जाते. याव्यतिरिक्त हरभरा डाळीमध्ये फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
जर आपण फक्त प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर हरभरा डाळ सर्वात जास्त फायदेशी ठरते. कारण प्रत्येक 100 ग्राम मध्ये सुमारे 28 ते 30 ग्रॅम प्रथिने आढळतात. पण जर तुम्हाला हलके आणि सहज पचणारे अन्न हवे असेल तर तुम्ही मूग डाळ खाऊ शकता. तसेच मसूर डाळ लोह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. जर तुम्हाला संतुलित आहार हवा असेल तर या सर्व डाळींचा आहारात समावेश करा आणि दररोज वेगवेगळे कडेधान्य खा. जेणेकरून शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतील.