Pune Crime: नोकरी जाण्याची भिती, आचारीने दुसर्या आचाऱ्याचा चाकूने गळा कापला, पुण्यात भरदिवसा हत्या
Saam TV February 09, 2025 12:45 AM

बारमधील एका आचाऱ्यानं सहकर्मचारी असलेल्या आचाऱ्याचा धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील म्हाळुंगे पोलिस स्टेशन हद्दीतील हॉटेल ऐश्वर्या गार्डन अँड बारमध्ये घडली आहे. दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादावादीमध्ये आचाऱ्यानं सहकर्मचारी असलेल्या आचाऱ्याचा चाकूने गळा चिरला. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

(वय वर्ष ३५) असे आरोपीचे नाव आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ऐश्वर्या गार्डन अँड बार येथे स्वयंपाकीचं काम करीत आहे. आरोपी उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी बार मालकाने विजय विनायक पांचाळ (वय वर्ष ३५) या आचाऱ्याला कामावर ठेवले होतं.

बार मालक आपल्याला कामावरून काढून तर टाकणार नाही ना, या भीतीने सुनील उर्फ उदय गिरी याने विजय पांचाळ याच्याशी वाद घातला. उदयगिरी या आरोपीचा राग अनावर झाला. त्यानं चाकू घेतला आणि थेट विजयवर सपासप वार केले. तसेच केले.

या हल्ल्यात विजय पाचांळे गंभीर जखमी झाले. रूग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.