Anjali Damania: महायुती सरकारमधील मंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यामध्ये मुंडे यांनी नॅनो लिक्विड युरियाच्या बाटल्यांची भरमसाठ किंमती वाढवून लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता आपल्या या आरोपांना पुष्टी देण्यासाठी त्यांनी या युरियाच्या बाटल्या खरेदी केल्या असून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठवणार आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन नुकतीच माहिती दिली.
हेच नॅनो युरिया आणि डीएपी संदर्भातही खरे आहे. जर हे खरोखरच शेतकऱ्यांना वितरित केले गेले असतील, तर मी आपणास विनंती करतो की आपण सरकारकडे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि त्यांचे फोन नंबर मागवावे. जेणेकरून सत्य पडताळणी करता येईल आणि खरोखर लाभ मिळाला का, हे निश्चित करता येईल. यातील गैरव्यवहार आपल्या कल्पनेपेक्षा मोठा आहे, असे वाटते. आपण यावर आणखी पाठपुरावा करून वस्तुस्थिती समोर आणावी ही विनंती. नेमका घोटाळा काय?दमानिया यांनी केलेल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलं की, "Nano Urea ₹९२ प्रति ५०० मिली बाटली आणि Nano DAP प्रति ₹२६१ प्रती ५०० मिली बाटली मला घरपोच पाठवण्यात आली आहे. या बाटल्या मी आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे" या बाटल्यांच्या शिपमेंटचे डिटेल्सही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांनुसार यातून त्यांना हेच सांगायचं आहे की ज्या युरियाच्या हँड स्प्रेच्या बाटल्यांच्या किंमती अनुक्रमे ९२ रुपये आणि २६१ रुपये आहेत. याच बाटल्या तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरियाची अर्धा लिटरची एक बाटली २२० रुपये प्रमाणं १९,६८,००० बाटल्या विकत घेतल्या तर नॅनो डीएपीची अर्धा लिटरची बाटली ५९० रुपयांप्रमाणं १९,५७,००० बाटल्या विकत घेतल्या.
या घोटाळ्यासंदर्भात अंजली दमानिया यांना एका अज्ञात शेतकरी व्यक्तीनं घोटाळ्याचे डिटेल्स पाठवले होते. याची माहिती स्वतः दमानिया यांनी यापूर्वी ट्विटद्वारे दिली होती. यात म्हटलं होतं की, आपण धनंजय मुंढे यांनी शेतकऱ्यांसाठी हँडस्प्रे उच्च दराने खरेदी केल्याचा विषय समोर आणला. मात्र, प्रश्न असा आहे की हे हँडस्प्रे गेले कुठे? ते कोणत्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले? मी स्वतः शेतकरी असून, मला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मी आणि माझ्या परिसरातील इतर शेतकऱ्यांपैकी कोणालाही हे लाभ मिळाल्याचे माहिती नाही. केवळ कागदावरच “देणे-घेणे” झालेले दिसते.
हेच नॅनो युरिया आणि डीएपी संदर्भातही खरे आहे. जर हे खरोखरच शेतकऱ्यांना वितरित केले गेले असतील, तर मी आपणास विनंती करतो की आपण सरकारकडे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आणि त्यांचे फोन नंबर मागवावे. जेणेकरून सत्य पडताळणी करता येईल आणि खरोखर लाभ मिळाला का, हे निश्चित करता येईल. यातील गैरव्यवहार आपल्या कल्पनेपेक्षा मोठा आहे, असे वाटते. आपण यावर आणखी पाठपुरावा करून वस्तुस्थिती समोर आणावी ही विनंती.