Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी. कला-अद्वैतची गोष्ट असणारी ही मालिका सध्या अनेकांना आवडतेय. त्यातच मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.
मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स सुरु आहेत. नैनाचा खोटेपणा समोर आल्यानंतर चांदेकरांकडून कलाच्या आई-वडिलांना खूप अपमान सहन करावा लागतोय. त्यातच आता लोकही कलेच्या आईचा अपमान करायला लागले आहेत. स्वतःची खरी बाजू सांगूनही लोक त्यांना नाव ठेवत आहेत. त्यातच अद्वैत कलाच्या आई-बाबांच्या बाजूने उभा राहतो.
प्रोमोमध्ये पाहायला मिळालं कि, कलेच्या आईच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. त्यावेळेस आलेल्या बायका नैना वरून त्यांचा अपमान करतात. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि तिची बाजू घेतो, "त्यांच्या संस्कारांवर बोट उचलण्याचा अधिकार कुणी दिला तुम्हाला ? मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या आयुष्यात तेच जबाबदार असतात. यात आई-वडिलांच्या संस्कारांचा दोष नसतो." हे ऐकून एक बाई कलेच्या आईला "तुझा जावई शंभर नंबरी सोनं आहे" असं म्हणतात. तर कलाही अद्वैत खुश होते आणि "हे सोनं मला आयुष्यभर गळ्यात मिरवायचं आहे" असं म्हणते.
मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले. मालिका अशी हवी, जावई हवा तर असा, ही मालिका सध्या मालिका कशा असाव्यात याचा मास्तरक्लास आहे अशा अनेक कमेंट्स प्रोमोवर केल्या आहेत.
मालिकेचा हा एपिसोड 12 फेब्रुवारीला मंगळवारी रात्री 9.30 वाजता पाहायला मिळेल. बघायला विसरू नका लक्ष्मीच्या पाऊलांनी सोमवार ते शनिवार रात्री 9.30फक्त स्टार प्रवाहवर.