आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी पाकिस्तानमध्ये त्रिसदस्यीय मालिकेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. न्यूझीलंड, यजमान पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका असे 3 संघ या मालिकेत सहभागी आहेत. मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना 78 धावांनी जिंकत विजयी सुरुवात केली. मात्र न्यूझीलंडला या सामन्यादरम्यान मोठा झटका लागला. न्यूझीलंडचा ऑलराउंडर रचीन रवींद्र याला जबर दुखापत झाली. रचीनचा कॅचच्या प्रयत्नात अंदाज चुकला. त्यामुळे बॉल थेट रचीनच्या चेहऱ्यावर आदळला, ज्यामुळे खेळाडू रत्तबंबाळ झाला. त्यामुळे रचीनला मैदानाबाहेर जावं लागलं. हा सारा प्रकार पाहून क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावात घडला. पाकिस्तान विजयी धावांचा पाठलाग करत होती. पाकिस्तानकडून 38 व्या ओव्हरमध्ये खुशदिल शाह बॅटिंग करत होता. खुशदिलने डीपमध्ये फटका मारला. रचीनने कॅचचा प्रयत्न केला. मात्र रचीनचा अंदाज थोडा चुकला. त्यामुळे रचीनच्या तोंडावर बॉल आदळला. त्यामुळे रचीन रक्तबंबाळ झाला. रचीनच्या चेहऱ्यातून रक्त निघू लागलं. त्यामुळे मेडीकल स्टाफ आणि सुरक्षारक्षक मैदानात आले.रचीनवर प्रथमोपचार केले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीय वंशाचा असलेला रचीन हा न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. रचीनने अवघ्या काही वर्षांमध्येच न्यूझीलंड टीममध्ये आपलं स्थान निर्माण केलं. रचीनने 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 970 धावा केल्या आहेत. तसेच 18 विकेट्सही घेतल्या आहेत.
दरम्यान न्यूझीलंडने हा सामना 78 धावांनी जिंकला. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानची आश्वासक सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने कमबॅक केलं आणि पाकिस्तानचा बाजार उठवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 47.5 ओव्हरमध्ये 252 धावांवर गुंडाळलं.
रचीनला जबर दुखापत
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, खुशदिल शाह, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), रचीन रवींद्र, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, बेन सीयर्स आणि विल्यम ओरुर्के.