IND vs ENG; रोहितने शतक झळकावून केला कमबॅक! विराटचा खराब फाॅर्म कायम
Marathi February 10, 2025 07:24 AM

भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा वनडे सामना सामना कटकच्या मैदानार खेळला गेला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विजयासहित भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार शतक झळकावले.

305 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी भारतासाठी सलामी दिली. दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आक्रमक सुरूवात केली. शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. दरम्यान तो 60 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीस आला. सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र कोहलीने निराश केले.

विराट कोहली इंग्लंडचा दिग्गज फिरकीपटू आदिल रशीदच्या फिरकी गोलंदाजीवर यष्टीरक्षक फिल साल्टच्या हातात झेलबाद झाला. कोहलीला अवघ्या 5 धावांवर रशिदने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान कोहलीने आपल्या फलंदाजीने पुन्हा सर्व चाहत्यांना निराश केले. पण रोहित शर्माने शानदार पुनरागमन करत आपल्या चाहत्यांना खूश केले. त्याने आक्रमक अंदाजात शतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली. रोहितने 90 चेंडूत 119 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 12 चोकारांसह 7 षटकार ठोकले.

आता दोन्ही संघात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना (12 फेब्रुवारी) रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) कमबॅक करतो हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात
IND vs ENG; हिटमॅनचा धमाका! भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा धोबीपछाड
हिटमॅनचा धमाकेदार कमबॅक! शतकी खेळीने टीकाकारांची बोलती बंद!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.