निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. योग्य व्यायाम आणि नियमित आहार घेतल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्गाचे आजार होत नाहीत. भाज्यांचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. परंतु अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही. कारल चवीला कडू आहे यात शंका नाही, पण त्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होतेच, शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कारल्याचे तुमच्या आहारामध्ये नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कारल्यामुळे नक्की काय फायदे होतात चला जाणून घेऊया.
कारल्याचे सेवन मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारल्याच्या नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील सखरेची पातळी नियंत्रित राहाते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. कारल्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होते. कारल्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु काही असे पदार्थ आहेत ज्याचे सेवन कारल्यासोबतच चुकूनही करू नका. या गोष्टीचे सेवन कारल्यासोबत केल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
कारल्यासोबत चुकूनही गोड फळ खाऊ नये. माहितीनुसार, कारले खाल्ल्यानंतर आंबा, केळी, चिकू इत्यादी गोड फळं खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, कारल्याची चव कडू असते जेव्हा आपण कडू आणि गोड या पदार्तांचे एकत्र सेवन करतो त्यावेळी अन्नाची चव खराब होते आणि पोटावर गंभीर परिणाम होऊ शकतात. – कारल्यापासून बनवलेल्या पाककृतींसोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कधीही खाऊ नयेत. दुधासोबत कारल्याचे सेवन केल्याने त्याची चव बदलते. जेव्हा तुम्ही दूध किंवा इतर कोणतेही दुग्धजन्य पदार्थ कारल्यासोबत खाता तेव्हा त्याचे हानिकारक परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. काही लोक कारल्याची चव सुधारण्यासाठी त्यात मध मिसळतात, जेणेकरून त्याची कडूपणा कमी होईल आणि त्यात गोडवा येऊ शकतो, पण हे करणे देखील चुकीचे आहे. कधीही कारल्यात मध घालून शिजवू नका, अन्यथा ते शरीरात विषारी पदार्थ तयार करू शकते.
कारल्याची चव कडू असल्याने त्यात खडे मसाले घालू नका. कोणत्याही कारल्याच्या रेसिपीमध्ये दालचिनी, काळी मिरी, जायफळ, लवंगा असे संपूर्ण मसाले घालू नका, अन्यथा चव तिखट, कडू होईल आणि ते खाण्यायोग्य राहणार नाही. जास्त आम्लयुक्त पदार्थांसोबत कारल्याची भाजी बनवू नका किंवा खाऊ नका. यामध्ये लिंबूवर्गीय फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही टोमॅटो कारल्यासोबत खाल्ले तर त्याची कडूपणा आणखी तीव्र होऊ शकते. आम्लयुक्त घटक कारल्यामध्ये मिसळल्यामुळे त्याचा कडूपणा आणखी वाढवतो. यामुळे चवही खराब होऊ शकते.
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, झिंक, पोटॅशियम, फायबर इत्यादी पोषक तत्वे असतात. कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरीसारखे गुणधर्म असतात. कारल्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाहीत. कारल्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. कारल्याचे सेवन केल्याने मधुमेह, मूत्रपिंड दगड, मूळव्याध आणि जखमा बरे होतात. कारल्याचे सेवन केल्याने मलेरिया आणि कावीळ टाळण्यास मदत होते. कारल्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.