जलगाव गुन्हेगारीच्या बातम्या: अमळनेर (Amalner) येथील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत शिंगारे यांची 9 लाखांची रोकड असलेली बॅग भरदिवसा बँकेसमोरुन चोरट्यांनी लांबवली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संशयित आरोपी अमळनेरहून जळगावच्या (Jalgaon) दिशेने फरार झाले आहेत. शिंगारे यांची सेवानिवृत्तीची बँकेतून रक्कम काढून घरी नेत असताना ही घटना घडली आहे. दोन दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी शिंगारे यांची बॅग लांबवली आहे.
प्राथमिक तपासात संशयित आरोपी आंध्र प्रदेशचे असावेत, अशी माहिती समोर आली आहे. घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, भरदिवसा ही चोरीची घटना घडल्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भरदिवसा चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..