वाकवली येथे महसूल पंधरवडा
esakal February 10, 2025 10:45 PM

वाकवली येथे
महसूल पंधरवडा
गावतळे ः शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत विविध सरकारी योजनांचा सर्व जनतेला लाभ मिळावा या उद्देशाने महसूल पंधरवडा कार्यक्रमाचे वाकवली मंडळ प्रक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा गावतळे येथे ९ फेब्रुवारी रोजी सुरवात झाली आहे. या वेळी महसूल विभागामार्फत जनतेला जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिलेयर दाखले, संजय गांधी, इंदिरा गांधी योजनेची माहिती व अर्ज स्वीकारणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे व दाखल करणे तसेच नवीन रेशनकार्ड अर्ज स्वीकारणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ॲग्रीस्टॅग योजना, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजना महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड माहिती, मागील त्याला शेततळे, जलकुंड, प्रधानमंत्री सुरक्षा अन्नप्रक्रिया योजना, आत्माअंतर्गत पीक प्रात्यक्षिक, हवामानआधारित पिकविमा योजना अशा विविध योजनांची माहिती व दाखले मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
---
तळवडे शाळेने देशभक्त
पिढी घडवली ः खापणे
राजापूर : तालुक्यातील तळवडे येथील जिल्हा परिषद शाळेने देशभक्त पिढी घडवली असून, या शाळेचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सह्याद्री परिसर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे यांनी केले. या वेळी पितांबरी उद्योगसमुहाचे प्रतिनिधी उमेश शिंदे, उद्योजक संजय कोकरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजयकुमार बंडगर, लांजा शिक्षण विभागाचे विनोद सावंग, सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, अपेक्षा मासये आदी मान्यवर उपस्थित होते. या शाळेतून इतरत्र बदली होऊन गेलेले व सेवानिवृत्त झालेले शिक्षक, भारतीय सैन्यदलात कार्यरत राहून देशसेवा करणारा माजी विद्यार्थी अक्षय मोरे, प्रगतशील शेतकरी शिवाजी रबसे, सुरेश गुडेकर, शाळेसाठी विनामोबदला जमीन देणारे राधिका राजाराम मोरे, दत्ताराम मोरे, सचिन मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.