हिंगोली : भारतीय रेल्वेतर्फे स्वरेल सुपर ॲप लाँच करण्यात आले असून यामुळे रेल्वे प्रवाशांना एकाच ॲपवर रेल्वे संदर्भात सर्व माहिती मिळणार असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्टर पप्पूकुमार यांनी दिली आहे.
अकोला-पूर्णा रेल्वेमार्गावरून हिंगोली मार्गे अनेक दैनिक पॅसेजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांसह अनेक द्विसाप्ताहिक, साप्ताहिक व स्पेशल रेल्वे धावतात. वेगवेगळ्या रेल्वे सुविधांसाठी वापरकर्त्यांना वेगवेगळे ॲप्स वापरावे लागतात. आता स्वरेल ॲपद्वारे प्रवाशांना या एकाच ॲपवर रेल्वे संदर्भात सर्व माहिती व सेवा मिळणार आहेत.
ॲपच्या मदतीने अनरक्षित तिकीट बुक करून प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि पीएनआर बदल माहिती देखील मिळणार असण्याची माहिती स्टेशन मास्टर पप्पुकुमार यांनी दिली. रेल्वेच्या सर्व सेवा ‘स्वरेल’ या सुपर ॲपद्वारे मिळणार आहेत.
मोबाइलमधील स्टोअरेज स्पेस ही वाचणार आहे. या बदल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, प्रवीण पडघन, भरतलाल साहू, डॉ. विजय निलावार आदींनी अभिनंदन केले आहे.