Raigad Crime : रायगडमध्ये दीड कोटीच्या दरोड्याचा बनाव; दोन पोलिसांचाही सहभाग
Saam TV February 10, 2025 10:45 PM

सचिन कदम 
रायगड
: रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असे सांगून व्यापाऱ्याला लुबाडणूक करण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र पोलीस तपासात या घटनेचे सत्य समोर आले असून दीड कोटी रुपयांचा झालेल्या दरोड्याचा बनाव करण्यात आला होता. तर या प्रकरणात चक्क दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

मध्ये काही दिवसांपूर्वी सात किलो सोन स्वस्तात देण्याचे सांगत साधारण दीड कोटी रुपयात फसवणूक झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करत दीड कोटी रुपयांची लुबाडणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून नी तपास सुरु करण्यात आल्या. या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे. 

असा करण्यात आला होता बनाव 

दरम्यान या घटनेत सात किलो सोनं स्वस्तात देण्याचे सांगण्यात आले होते. तर ५ कोटी रूपयांच्या सौद्यापोटी दीड कोटी रुपये घेऊन फिर्यादी अलिबागला येत असताना तिनवीरा येथे पोलिस तपासणीचे नाटक करण्यात आले. यावेळी पोलीस आले म्हणून पळापळ सुरू होताच व्यापाऱ्याचे दीड कोटी रूपये लंपास करून दोघे फरार झाल्याचे सांगण्यात आले होते. 

दोन पोलिसांचा सहभाग 

दिड कोटीच्या दरोड्यात चक्क दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. स्वस्तात सोनं देतो असे सांगून एका टोळीने व्यापाऱ्याला लुटल. या गुन्ह्याचा तपास करीत असताना दरोड्याच्या गुन्ह्यात रायगड पोलिस दलातील दोन कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासाअंती दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.