सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चांगलेच जागत आहे. सेलिब्रिटी आपल्या मेजवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर शोमधील मास्टरशेफ एकमेकांसोबत भन्नाट वेळ देखील घालवताना दिसत आहेत. या शोमध्ये तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कड, उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) , निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, फैजू असे अनेक कलाकार मंडळी आहेत.
'सेलिब्रिटी 'मध्ये फैजू आणि उषा नाडकर्णी यांचा खूप छान बाँडिंग पाहायला मिळत आहे. ही दोघे सेटवर खूप मजा मस्ती करताना दिसतात. नुकताच फैजूने उषा नाडकर्णी यांच्यासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात फैजू आणि उषा नाडकर्णी भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहेत. फैजूने तर व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "+ उषा आई = फुल्ल व्हायब्स"
नाडकर्णी यांनी फैजूसोबत (Faisal Shaikh ) 'गोरी है कलाइयां' या बादशहाच्या गाण्यावर ठुमके लगावले आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या बाँडिंगचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. उषा नाडकर्णी यांचा डान्समध्ये हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या डान्समध्ये तुफान एनर्जी दिसत आहे. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' मध्ये 11 कलाकार आहेत. शोमध्ये नुकतेच पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. चंदन प्रभाकर याची शोमधून एक्झिट झाली आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये फैजूला पॉवर कार्ड मिळाल्यानंतर त्याने त्याचा वापर करून उषा नाडकर्णी यांना सेफ केले होते. तेव्हा फैजू उषा नाडकर्णी यांच्या बद्दल म्हणाला की, "उषा ताई माझ्या आईसारखी आहे. त्यांच्यासाठी पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक हळवी जागा आहे." यानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.