Maharashtra Live Update: यवतमाळ जिल्ह्यात ३५०० लाडक्या बहिणी अपात्र
Saam TV February 11, 2025 04:45 PM
Crime : उरण बोरखारमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची मुलींना अमानुष मारहाण, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

समस्त पालकांच्या मनात धडकी भरवणारी घटना उरणमध्ये घडली आहे. उरणच्या बोरखारमधील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलेय. अशोक कुटे असे या शिक्षकाचे नाव असून विद्यार्थ्यांना दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही या रागातून त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना अंगावर, गालावर लाल चट्टे उठेपर्यंत मारहाण केलेय. या मारहाणीने मानसिक धक्का बसलेल्या विद्यार्थिनीना अश्रू अनावर झाल्याने त्या रडू लागल्या. संबंधित घटना पालकांना कळताच पालकांनी शाळेत येत शिक्षकाला धारेवर धरले. पालकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केलेय. तर पोलीसांनी शिक्षक अशोक कुटे याला ताब्यात घेतले असणार अधिक चौकशी करण्यात येतेय.

Maharashtra Live Update: यवतमाळ जिल्ह्यात साडे तीन हजार लाडक्या बहिणी अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार 891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून ही कारवाई मंत्रालय स्तरावरून करण्यात आली आहे या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत यवतमाळ पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यात समावेश आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज अनेक संघटनांकडून आंदोलनं

सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर विविध संघटनांच्या वतीने करण्यात येणार आंदोलनं

सोलापूरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्यं केल्याप्रकरणी अनेक संघटनांकडून निषेध व्यक्त

सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलनं

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार

दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे गाडी धावणार

मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली माहिती

यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद राजधानी दिल्लीकरांकडे आहे

दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती

१९ फेब्रुवारीला पुणे ते दिल्ली-सफदरजंग ही रेल्वे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल

रविवारी (२३ फेब्रुवारी) दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री १०.३० वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल

तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी नोंदवला जबाब

काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला

खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का?

बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी केले होते विमानाचे बुकिंग

६८ लाख रुपये देऊन एका खाजगी विमानाने सावंत यांचे चिरंजीव निघाले होते बँकॉक ला

नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा पोलिस करण्याची शक्यता

तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं?

समय रैनाच्या कार्यक्रम विरोधात राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) ची कारवाई

रणवीर अलाहाबादिया चा "तो" व्हिडिओ तातडीने काढून टाकण्याचे सुद्धा दिले आदेश

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली ‘India’s Got Latent’ कार्यक्रमाची गंभीर दखल

समय रैनाच्या या शोमधील अश्लील, अशोभनीय आणि अनुचित कन्टेन्ट ची आयोगाकडून गंभीर दखल

या कार्यक्रमाची युट्यूबकडे तक्रार दाखल

तक्रारीत भारतीय समाज, महिला आणि मुलांविरोधात अवमानकारक वक्तव्यांचा suddha आरोप

IT Act आणि POCSO Act अंतर्गत कायदेशीर उल्लंघनांची चौकशी सुरू करण्याचे दिले आदेश

Pune : पुण्यात आणखी एका जी बी एस रुग्णाचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद

पुण्यातील बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी वाहनचालक म्हणून करीत होता काम

या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता

यामुळे राज्यात आतापर्यंत जी बी एस मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात वर

आता संशयित जीबीएसची रुग्णसंख्या १९२ त्यातील १६७ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे.

पुणे महापालिका ३९, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९१, पिंपरी-चिंचवड महापालिका २९, पुणे ग्रामीण २५ अशी रुग्णसंख्या आहे

राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत

राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ४८ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

Crime News : अमरावतीत उभ्या कारमध्ये आढळला मृतदेह

अमरावतीच्या काँग्रेस नगर रोड वरील होमगार्ड मुख्यालय बाजूला चारचाकी वाहनात एका 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे, घटनास्थळी फॉरेन्सिकच्या टीमकडून बंद कारची तपासणी केली गेली गाडीवरचे फिंगरप्रिंट घेण्यात आले असून डॉग्स कॉट पण बोलण्यात आले, तर कारचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला,या घटनेचा उलगडा उघडायचा आहे आत्महत्या की हत्या पोलीस तपासात समोर येईलच या मृतकाची ओळख पटली असून हा अमित आठवले असून राहणार वडाळी या परिसरात राहत आहे,मृतक अमित या गाडीमध्ये कसा आलेला याचा मृत्यू कसा झाला याचा शोध सद्या फेजरपुरा पोलीस घेत आहेत..कारण मृतदेहाच्या कानातून नाकातून रक्त वाहत होते त्यामुळे हत्या की आत्महत्या या दोन्ही अनुषंगाने पोलीस तपास करीत आहे...

Nashik : पाकिस्तानसाठी हेरगिरी, नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील २ जवानाना पंजाबमध्ये अटक

- पंजाब पोलिसांची कारवाई, तर तिसरा संशयित नाशिकच्या छावणीतून फरार

- १५ लाख रुपये घेऊन शस्त्रास्त्रांची माहिती, नकाशे आणि गोपनीय माहिती पुरवली

- अटक करण्यात आलेले जवान आणि फरार जवान पंजाबचे

- सुटीवर गावी आल्यानंतर ड्रग्स आणि शस्त्र विक्री रॅकेट चालवत असल्याचं देखील पंजाब पोलिसांच्या तपासात उघड

- आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचं समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांकडून आरोपींचे ३ मोबाईल जप्त, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

Maharashtra Live Update: उल्हासनगरात कारने दुचाकीला उडवलं

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात एका दुचाकीवरून दोन इसम रस्ता क्रॉस करत होते. याचवेळी तिथून जाणाऱ्या कारची या दुचाकीला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती, की दुचाकीवरचे दोघे जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुचाकीवरील दोघांना फारशी गंभीर इजा झालेली नसून याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली नसल्याचंही सांगितलं जातंय.

शिवप्रतिष्ठानच्या धारातीर्थ मोहिमेची आज किल्ले रायगडावर होणार सांगता

संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रा या गडकोट मोहिमेची आज किल्ले रायगडावर सांगता होत आहे. या सांगता समारंभा निमित्ताने होळीच्या माळावर होणाऱ्या कार्यक्रमात संभाजी भिडे धारकऱ्याना संबोधित करतील. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील समाधीचं दर्शन घेऊन 7 फेब्रुवारी रोजी या पदयात्रा मोहिमेला प्ररंभ झाला. राज्यभरातून 80 हजारा पेक्षा अधिक धारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आजच्या सांगता कार्यक्रमात संभाजी भिडे धारकऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Agro News : दहा दिवसानंतर सीसीआयची कापूस खरेदीला सुरुवात

कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून सीसीआयने कापूस खरेदी थांबवली होती मात्र दहा दिवसानंतर यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदी पुन्हा सुरू केली. परंतु नोंदणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून सर्व्हर सुरू होत नसल्याने सीसीआयचीसुद्धा कापूस खरेदी करण्याची मानसिकता दिसत नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस खाजगी बाजारात विक्री करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Washim News : वाशीम शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था वाहनचालकांचे हाल...

वाशीम शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यात प्रामुख्याने नगरपरिषद ते जिल्हा सामान्य रुग्णालय या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे, पोलिस स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांची सुद्धा मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्तावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज अपघात घडत आहेत. या रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आहे की, अनेक रस्त्यावरचे डांबर उघडून चुरी उघडी पडली आहे, त्यामुळे अनेकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची परिस्थिती जैसे ते तशीच आहे. त्यामुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

dharashiv : धाराशिव मध्ये शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षण विद्युत रोषणाई

छञपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असुन छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षण अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच पुतळ्याभोवती आकर्षण राजवाड्याचा देखावा साकारण्यात आला आहे. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समीतीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंञी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान आगामी 19 फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

buldhana News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीचा तात्काळ अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी...

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, आसा दुधा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते, मात्र तीन महिने उलटूनही अनुदान मिळाले नाही, या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चकरा मारून ही अनुदान मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेत तात्काळ अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.. अन्यथा कार्यालयातच आत्महत्येचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे...

Beed News : बीड जिल्ह्यातील 43 हजार 756 विद्यार्थी देणार परीक्षा.. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 106 बैठे पथक..

बारावीच्या परीक्षेला आज पासुन सुरूवात होत आहे. बीड जिल्ह्यातील ४३ हजार ७५६ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून परिपूर्ण नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक राहणार असुन..सात भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.. तसेच ४९ परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचारी बदलले आहेत.. सर्व परीक्षा केंद्र जवळ कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत..

Washim News : पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचासह गावातील महिलांचे साखळी उपोषण

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद येथे जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे काम मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावातील महिलाना हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटर वरून पायपीट करावी लागत आहे. दरम्यान,पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढल्यानंतर आता सोमवारपासून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक साखळी उपोषणाला बसले आहेत.

HSC Exam : अमरावती विभागात १ लाख ५२ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसणार,

आजपासून बारावीच्या परीक्षाला सुरवात होणार आहे, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतील १ लाख ५२ हजार ९८२ विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा ५४२ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. परीक्षा काळात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी ९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र महिला भरारी पथक कार्यरत असणार आहे. तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराची निगराणी असणार आहे,त्यामुळे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसाहित्याचा वापर करू नये व परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जावे. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक तैनात केला जाणार आहे, परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर बाहेर झेरॉक्स सेंटर बंद असणार आहे,परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.