मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूकडे पाहिले जाते.
मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'सैराट' चित्रपटातील आर्चीची भूमिका प्रचंड गाजली अन् रिंकू राजगुरू रातोरात सुपरस्टार झाली.
रिंकू राजगुरूचा जन्म ातील अकलूज येथे 3 जून 2001 रोजी झाला आहे. तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. लहानपणापासून कलेची आवड असल्यामुळे तिनं अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
अनेक मराठी-हिंदी चित्रपटांसह वेबस्टोरीमधील भूमिका गाजल्यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
रिंकू राजगुरूचा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.तसेच नेटकऱ्यांकडून फोटोवर मीम्सचा पाऊस पाडला जात आहे. वहिनीपर्यंत जोडलं कनेक्शन..
कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांचा कृष्णराज हा सगळ्यात धाकटा चिरंजीव आहे. त्याने राजकारणापलिकडे जात वेगळा मार्ग निवडला आहे. कृष्णराज हा यूट्यूबर आहे. असून त्याच्या चॅनेलचे साडेचार लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
कृष्णराज महाडिकांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्री रिंकू राजगुरूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ' अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,' असे कॅप्शनही दिले आहे.
भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांनी थेट रिंकू राजगुरूसोबतच फोटो टाकल्यानं चाहत्यांनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. काहींनी तर थेट 'वहिनी आहे काय' अशीही विचारणा केली आहे.
कृष्णराज सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं नेहमीच दिसून येतं. त्याच्या स्वतःच्या यूट्युब चॅनलवर महाडिक फॅमिलीतील अनेक प्रसंग शेअर करत असतो. कृष्णराजची सोशल फेसबुक, इन्स्टाग्रामवर आणि ट्विटवरही प्रचंड क्रेझ आहे.