जेईई मेन 2025चा निकाल जाहीर, तुमचा स्कोअरकार्ड अशा प्रकारे तपासा आणि डाउनलोड करा
Webdunia Marathi February 12, 2025 01:45 AM

जेईई मेन्सच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईई सत्र १ चा निकाल जाहीर केला आहे. या निकालासोबत टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.


जेईई मेन्स पेपर1 22 जानेवारी, 23 जानेवारी , 24 जानेवारी , 28 जानेवारी आणि 29 जानेवारी रोजी घेण्यात आला. ही परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

जेईई मेन्सच्या परीक्षेला बसणारे उमेदवार JEE Mains च्या अधिकृत वेबसाइट jeemains.nta.nic.in वर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून त्यांचा निकाल तपासू शकतात


या परीक्षेसाठी 13 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले असून सुमारे 12 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली.

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, गुजराती, मल्याळम, तामिळ, उर्दू, तेलगू अशा एकूण 13 भाषांमध्ये घेण्यात आली.

ही परीक्षा भारताबाहेर 15 शहरांमध्ये मनामा, दोहा शहर, दुबई, मस्कत, शारजाह, रियाध , कुवेत, सिंगापूर, क्वालालंपूर, काठमांडू, अबुधाबी, पश्चिम जावा, वाशिंग्टन, लागोस आणि म्युनिक येथे घेण्यात आली. जेईई मेन्स सत्र 1 2025 च्या परीक्षेत 14 उमेदवारांनी 100 गुण मिळवले आहे. परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षा पाहू शकतात.

लिंकवर क्लिक केल्यावर एक त्रुटी दिसून येते. असा दावा केला जात आहे की एनटीएने तांत्रिक समस्या सोडवल्यानंतर, विद्यार्थी या लिंकवरून (jeemain.nta.nic.in/results-for-jeemain-2025-session-1/link) त्यांचा जेईई मुख्य निकाल आणि स्कोअर कार्ड तपासू शकतील.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.