बऱ्याचदा सिनेमा बघताना किंवा हलका स्नॅक म्हणून आपण पॉपकॉर्नचा आनंद घेतो. हा हलका आणि कुरकुरीत पण स्वादिष्ट स्नॅक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया पॉपकॉर्न खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे.
पॉपकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या टळते. तसेच पोटही भरण्यास मदत होते.
पॉपकॉर्नमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करतात. तसेच कर्करोग, हृदयविकार आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यात मदत करतात.
फायबरयुक्त आहार हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. पॉपकॉर्नमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
विना बटर, मीठ आणि साखर, पोकॉर्न खाल्ले तर त्यात असणाऱ्या कॅलरीज फार कमी असतात. त्यामुळे वजन कमी करताना पॉपकॉर्नचा आहारात नक्की समावेश करा.
पॉपकॉर्न नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री असल्याने ग्लूटेन सेंसिटिव्हिट व्यक्तींसाठी किंवा सीलिएक आजार असलेल्या व्यक्तींना हे सुरक्षित आहे.
पॉपकॉर्न मक्याच्या धान्यापासून बनवले जातात. त्यामुळे त्यात कार्बोहायड्रेट्स असतात, जे ऊर्जा वाढवण्यास मदत करतात.
पॉपकॉर्न सहज उपलब्ध होणारे आणि कमी वेळात तयार होणारे स्नॅक आहे. जे वेगवेगळ्या चवींमध्ये देखील तयार करता येतात. म्हणूनच ते उत्तम स्नॅकचा पर्याय बनतात.