योगेश काशिद, साम टीव्ही
संतोष देशमुख प्रकरणामुळे बीड जिल्हा गाजत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणानंतर बीड पोलीस अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. बीडमध्ये पोलिासांनी आतापर्यंत ३१० शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच प्रशासनाने १२७ जणांवर कारवाई केली आहे.
बीड जिल्ह्यात पोलिसांकडून आतापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवानाचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे.
जिल्ह्यात १२८१ जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा एकूण 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्र परवाण्याचा मुद्दा चर्चेत आला.
जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तर 127 जणांवर कारवाई केली आहेत. यात आणखी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी आणखी 5 प्रस्ताव पाठवले आहेत. पोलिसांनी १९ जणांच्या अर्जावरही आक्षेप नोंदवला आहे.
धनंजय देशमुख यांचा पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थितबीड हत्या प्रकरणातील आरोपींच्या सीसीटीव्ही फुटेजवरून धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज सापडतात, मात्र पोलीस यंत्रणेला सीसीटीव्ही फुटेज का सापडत नाहीत, असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असते, तर माहिती मिळाली कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत मोकाट आहे. तोच कृष्णा आंधळे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळताना दिसत आहे, असेही त्यांनी सांगितला.