![](https://shengbo-xjp.oss-ap-southeast-1.aliyuncs.com/Upload/File/2025/02/12/1545127751.jpg)
साहित्य-
पालक दोन कप
उकडलेले बटाटे तीन
मटार तीन कप
शिमला मिरची दोन
दही एक कप
हिरव्या मिरच्या दोन
किसलेले आले अर्धा टीस्पून
हळद अर्धा टीस्पून,
गरम मसाला - अर्धा टीस्पून
वेलची पूड चिमूटभर
आमसूल पावडर - 3/4 टीस्पून
कोथिंबीर तीन टेबलस्पून,
भाजलेले बेसन तीन टेबलस्पून
तेल तीन टेबलस्पून
चवीनुसार मीठ
ALSO READ:
कृती-
सर्वात आधी पालक धुवून स्वच्छ करा. यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात पालक घालावा. आणि काही वेळ उकळवा. त्यानंतर, पालक चाळणीत ठेवा आणि गाळून घ्या जेणेकरून पाणी निघून जाईल. यानंतर पालक थंड पाण्यात टाका आणि एक मिनिट ठेवल्यानंतर बाहेर काढा. पालक थंड पाण्यातून काढल्यानंतर तो बारीक करून घ्या. एका पॅनमध्ये तेल घालावे व गरम झाल्यावर त्यात उकडलेले मटार घालावे आणि काही वेळ परतून घ्या. यानंतर पालक आणि चवीनुसार मीठ घाला. पालक आणि मटारमधील पाणी सुकेपर्यंत हे शिजवावे. यानंतर हळद आणि कोथिंबीर घालून एक मिनिट शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. आता हिरव्या मिरच्या आणि आले मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर उकडलेले बटाटे घ्या आणि ते किसून घ्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते तुमच्या हातांनी मॅश देखील करू शकता. यानंतर हिरवी मिरची-आले पेस्ट, गरम मसाला, वेलची पावडर, आमसूल पावडर घालावी व हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. यानंतर, भाजलेले बेसन, ब्रेडक्रंब आणि चवीनुसार मीठ घालावे आणि सर्वकाही चांगले मिसळा. आता या मिश्रणात पालक आणि मटार घाला आणि सर्व साहित्य एकसारखे मॅश करा. आता हे मिश्रण तुमच्या तळहातावर घ्या, त्यांना कबाबचा आकार द्या आणि एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. यानंतर, नॉन-स्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करा. त्यात थोडे तेल घाला आणि कबाब सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तर चला तयार आहे हरा भरा कबाब रेसिपी, टोमॅटो केचप आणि हिरवी चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik