कुरळे केसांसाठी बेस्ट आहेत ‘हे’ हेअर ऑइल, व्हॉल्यूम राहील अबाधित
GH News February 12, 2025 05:11 PM

कुरळे केस हे त्यांच्या सौंदर्यासाठी आणि अनोख्या पोतसाठी चांगलेच ओळखले जातात, परंतु सरळ केसांपेक्षा कुरळे केसांची काळजी घेणे थोडे कठीण असते. कुरळे केस अनेकदा कोरडे, फ्रिजी होतात, ज्यामुळे त्यांची निगा राखणे हे एक आव्हानात्मक होऊन जाते. कुरळे केसांची निरोगी वाढ टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना मऊ, चमकदार आणि त्यांचा व्हॉल्यूम टिकवून ठेवण्यासाठी केसांसाठी योग्य तेल निवडणे खूप महत्वाचे आहे.

जर तुम्हाला तुमच्या कुरळे केसांचा नॅचरल बाऊंस आणि चमक कायम ठेवायची असेल, तर आम्ही तुम्हाला कुरळ्या केसांसाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या काही उत्तम तेलांबद्दल सांगत आहोत. हे तेल केवळ तुमच्या केसांना सखोल पोषण देत नाही तर स्कॅल्पचे आरोग्य देखील सुधारते.

1) नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक तेलांपैकी एक मानले जाते. नारळाचे तेल कुरळ्या केसांमध्ये खोलवर जाऊन त्यांना पोषण देते आणि कोरडेपणा कमी करते. तसेच नारळाचे तेल खूप हलके असते, त्यामुळे कुरळे केसांवर तेल लावल्यास तुम्हाला जड वाटत नाहीत आणि केसांचा व्हॉल्यूमही चांगला राखला जातो.

2 ) आर्गन ऑईल

आर्गन ऑईलला “लिक्विड गोल्ड” देखील म्हटले जाते कारण ते केसांना हायड्रेट करत नाही तर ते चमकदार देखील करते. त्यात असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स कुरळे केस गुळगुळीत आणि मुलायम बनवतात, ज्यामुळे केस फ्रिजी होत नाही.

3) जोजोबा ऑईल

जर तुमचे कुरळे केस कोरडे आणि खराब होत असतील तर जोजोबा ऑइल वापरा. हे केसांची आर्द्रता नीट राखून ठेवते आणि स्कॅल्पचे खोल पोषण करते. जोजोबा ऑईलच्या नियमित वापराने, तुमचे कुरळे केस नैसर्गिकरित्या निरोगी आणि व्हॉल्यूम देखील चांगलाच राहतो.

4) ऑलिव्ह ऑइल

केसांना डीप कंडिशनिंग देण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खूप चांगले मानले जाते. टाळूचे पोषण करण्याबरोबरच, ते कुरळे केसांचे कुरळेपणा कमी करते आणि त्यांना सिल्की आणि सहज हाताळता येतील असे होतात.

5) बदाम तेल

बदामाचे तेल हलके असल्याने कुरळ्या केसांसाठी ते उत्तम पर्याय आहे. केसांना मजबुती देण्याबरोबरच ते त्यांचे व्हॉल्यूम देखील वाढवतात आणि त्यांना स्मूद लुक देतात. त्यामुळे केसांचे व्हॉल्यूम कायम राहते.

केसांचे तेल कसे वापरावे?

नारळ किंवा जोजोबा तेल कोमट करा आणि केस आणि टाळूला पूर्णपणे लावा. तेल लावल्यानंतर आपले केस टॉवेलमध्ये 30-45 मिनिटे गुंडाळा जेणेकरून तेल योग्य प्रकारे शोषले जाईल. शॅम्पू करण्यापूर्वी, तेलाने हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून रक्ताभिसरण सुधारेल आणि केसांची वाढ होईल. तसेच केस धुतल्यानंतर तुम्ही सीरम म्हणून आर्गन किंवा जोजोबा तेलाचे काही थेंब घेऊन केसांना लावू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.