'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर आहेत. 'छावा' (chhaava ) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. 'छावा' च्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
'' रिलीज होण्यासाठी आता फक्त एक दिवस उरला आहे. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत जात आहे. विकी कौशल आणि मंदान्ना (Rashmika Mandanna) चित्रपटाचे खूप तगडे प्रमोशन केले आहे. तसेच विकी आणि रश्मिका अनेक धार्मिक ठिकाणांना भेट सुद्धा दिली आहे. विकी कौशलने याआधी घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. आता विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना शिर्डीत पोहचले आहेत.
नुकतेच आणि रश्मिकाने साईबाबांचे दर्शन घेतले आहे. दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकी आणि रश्मिका साईबाबांचे आशीर्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी 'छावा'ची टीम सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. व्हिडीओमध्ये विकी रश्मिकाला दर्शना बद्दल सांगताना दिसत आहे. विकी रश्मिकाच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.
'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. 'छावा' चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशलने खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटासाठी विकी कौशलने तब्बल 25 किलो वजन वाढवले. तर घोडेस्वारी देखील शिकली. कठोर परिश्रमानंतर सात महिने विकीने आपले शरीर सिंहासारखे बनवले.