Stock Market Closing Today: सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत. बँक निफ्टी तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स 122 अंकांनी घसरून 76,171 वर बंद झाला आणि निफ्टी 26 अंकांनी घसरून 23045 वर बंद झाला. सकाळी बाजार उघडला तेव्हा शेअर बाजारात विक्री सुरु होती. दिवसभरात बाजार 500 हून अधिक अंकांनी घसरला, परंतु बंद होण्याच्या वेळेस त्यात चांगली रिकव्हरी झाली.
निफ्टीवरील आजच्या ट्रेडिंग सत्रात, M&M, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयशर मोटर्स, ITC, Hero MotoCorp या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर SBI Life Insurance, Bajaj Finserv, HDFC Life, UltraTech Cement, Tata Consumer या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.
सत्रादरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरले. तसेच बँक आणि मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. भारतीय रुपया बुधवारी 86.88 प्रति डॉलरवर बंद झाला, तर मंगळवारी तो 86.83 प्रति डॉलरवर बंद झाला होता.
BSE वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 12 फेब्रुवारी रोजी 407.48 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी 408.52 लाख कोटी रुपये होते.
अशाप्रकारे, BSE मध्ये लिस्टेड मार्केट कॅप आज सुमारे 1.04 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.04 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
कोणते शेअर्स वाढले?आज, बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स हिरव्या रंगात म्हणजेच वाढीसह बंद झाले. यामध्ये बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.64 टक्के वाढ झाली. यानंतर टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो (L&T), अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
तर उर्वरित सेन्सेक्समधील 16 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्स 2.78 टक्क्यांनी घसरले. तर ITC, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि IndusInd बँकेच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज एकूण 4,097 व्यवहार झाले. यापैकी 1,554 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,418 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 94 शेअर्स कोणतेही चढ-उतार न होता बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 45 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 721 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते.