आंबेठा : भाबोली ( ता.खेड ) येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत खेड तालुक्यासह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास ५०० बैलगाडे सहभागी झाले होते.येथील हिंदकेसरी घाटात ही शर्यत चार दिवस पार पडली.
सतत तीन वर्षे प्रथम येणाऱ्या बैलगाड्यास एक ट्रॅक्टर बक्षीस देण्यात आला.
तर फायनलमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या बैलगाड्यास एक ट्रॅक्टर आणि दुसऱ्या क्रमांकास एक ट्रॅक्टर बक्षिस ठेवण्यात आले होते. याशिवाय तिसऱ्या क्रमांकासाठी दोन बुलेट बक्षिस ठेवण्यात आल्या होत्या.तर चौथ्या क्रमांकासाठी दोन दुचाकी आणि पाचव्या,सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी प्रत्येकी एक दुचाकी,तसेच आठव्या क्रमांकासाठी एक फ्रीज, नवव्या क्रमांकासाठी एक एलसीडी आणि दहाव्या क्रमांकासाठी सायकल बक्षिस ठेवण्यात आली होती.
फायनलमध्ये विजयी ठरलेले बैलगाडे पुढीलप्रमाणेप्रथम क्रमांक -
१) किसन कोळेकर - बिभीषण भोसले
२) निवृत्ती शेटे - रवींद्र भेगडे
३) तुकाराम कडलग - बजरंग पडवळ
४) चेतन बोडके - अक्षय मुंगसे
द्वितीय क्रमांक -
१) पप्पू हुंडारे - शिवतेज वाजे
२) दिनेश लांडगे - मचिंद्र कराळे
३) प्रथमेश वाघोले - अविनाश शिंदे
४) नवनाथ होले - जय सचिन लांडगे
तृतीय क्रमांक -
१) रमण महादू निलख ( वडगाव कांदळी )
२) राजू पाचारणे - रामनाथ वारींगे
३) किसन म्हाळुंगकर - भगवान शिंदे
४) विकास वाडेकर - रामदास पडवळ
हे ठरले घाटाच्या राजाचे मानकरी१) पहिल्या दिवशी घाटाचा राजा म्हणून पांडुरंग किसन काळे (१०.७४ मिली )
२) दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा तुकाराम रामचंद्र कडलग ( १०.९७ मिली )
३) तिसऱ्या दिवशी घाटाचा राजा पप्पूशेठ हुंडारे ( ११.३९ मिली )
या शर्यत प्रसंगी आमदार बाबाजी काळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील,माजी महापौर राहुल जाधव,कैलास गाळव,जयसिंग एरंडे,आण्णासाहेब भेगडे,रामकृष्ण टाकळकर आदींनी भेटी दिल्या.
भांबोली येथील भैरवनाथ यात्रा कमिटीच्या माध्यमातून या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.