Indigo Offer: जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डे निमित्त फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप फायदेशीर आहे. इंडिगो एअरलाइन्सने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये जोडप्यांना कमी भाड्यात एकत्र प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. विमान कंपनीने दोन प्रवाशांसाठी तिकिटे बुक केल्यास 50 % पर्यंत सूट दिली आहे. ही ऑफर 12 फेब्रुवारी 2025 (दुपारी 12:1) ते 16 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:59) पर्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. ऑफरशी संबंधित अधिक माहिती तुम्ही एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करू शकता.
या ऑफर अंतर्गत एक अट देखील आहे की, ही ऑफर फक्त निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर लागू आहे. लक्षात ठेवा की प्रवासाची तारीख बुकिंगच्या वेळेपासून किमान 15 दिवसांनी असावी. दिलेल्या ऑफरचा तुम्ही अनेक प्रकारे फायदा घेऊ शकता. तुम्ही इंडिगोची वेबसाइट, मोबाइल अॅप, इंडिगो 6E स्काय आणि त्यांच्या प्रवास भागीदारांद्वारे हा लाभ घेऊ शकता. इंडिगो केवळ तिकिटांवरच नाही तर प्रवासाशी संबंधित इतर गोष्टींवरही सवलत देत आहे.
सामानावर 15 % पर्यंत सूटडोमेस्टिक आणि इंटरनॅशनल रूटवर प्रवाशांना जास्तीच्या सामानासाठी आगाऊ पैसे देऊन 15% पर्यंत सूट मिळू शकते. तसेच, मानक सीट निवडल्यास 15 % सूट उपलब्ध आहे. जर तुम्हाला अधिक आराम हवा असेल तर, इमर्जन्सी एक्झिट एक्सएल सीट्स देशांतर्गत फ्लाइट्ससाठी 599 रुपयांपासून आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी 699 रुपयांपासून उपलब्ध आहेत. इंडिगो विमान प्रवासादरम्यान खाण्यापिण्यावरही सूट देत आहे. आगाऊ जेवण बुक केल्यास 10 % सूट मिळेल, यामुळे विमानातील प्रवाशांना जेवण कमी दरात मिळेल.
फास्ट फॉरवर्ड सेवेवर सूटफास्ट फॉरवर्ड सेवेवर 50% पर्यंत सूट दिली जात आहे, यामुळे प्रवाशांना चेक-इन आणि बॅगेज हाताळणीमध्ये प्राधान्य मिळेल. इंडिगोच्या 6E प्राइम आणि 6E सीट अँड ईट सारख्या बंडल सेवांवर देखील 15% पर्यंत सूट दिली जात आहे.
इंडिगो 14 फेब्रुवारी 2025 रोजी 'फ्लॅश सेल' देखील आयोजित करणार आहे. या सेलमध्ये, वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे केलेल्या पहिल्या 500 बुकिंगवर विक्री भाड्यावर अतिरिक्त 10 % सूट दिली जाईल.
ही ऑफर व्हॅलेंटाईन डे रोजी रात्री 8 ते 11:59 पर्यंत चालेल आणि फक्त निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरच वैध असेल. या ऑफरमध्ये देखील प्रवासाची तारीख बुकिंग तारखेपासून किमान 15 दिवसांनी असावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.