ALSO READ:
मिळालेल्या माहितीनुसार शिवकुमार त्याच्या दुचाकीवरून जात होता. नवी मुंबईतील बेलपाडा-उत्सव चौकात शिवकुमार यांच्या दुचाकीसमोरून दोन दुचाकीस्वारांनी चुकून गाडी कापली. यावर शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांच्यात वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली आणि एका आरोपीने शिवकुमार यांच्या डोक्यावर हेल्मेटने हल्ला केला. हेल्मेट डोक्याला लागल्याने शिवकुमार रस्त्यावर पडला. आरोपी दोन दुचाकीस्वार तिथून फरार झाले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी शिवकुमार यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे.ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik