भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची, मोठी आणि बहुप्रतिक्षित बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाला केव्हापासून सुरुवात होणार? या हंगामांचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? याबाबतची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. त्या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रजत पाटीदार याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमातून रजत पाटीदार याचं आरसीबीचा कर्णधार म्हणून नावं जाहीर करण्यात आलं आहे.
फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबजदारी होती. मात्र आरसीबीने फाफला करारमुक्त केलं. त्यामुळे आरसीबीने नव्या कर्णधाराच्या शोधात होती. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांच्या नावाची चर्चा होती. मात्र अखेर आरसीबी टीम मॅनेजमेंटने रजत पाटीदार याच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केला आहे.
रजत पाटीदार यासह आरसीबीचा एकूण आठवा तर चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली या तिघांनी भारतीय म्हणून आरसीबीची धुरा सांभाळली आहेत. तसेच केविन पीटरसन, डॅनियल व्हीटोरी, शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसतील या विदेशी खेळाडूंनी याआधी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.
कॅप्टन रजत पाटीदार
आयपीएल 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, लियाम लिविंगस्टोन, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, रसिख डार सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंह, नुवान तुषारा, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंह आणि मोहित राठी.