गावठाण हद्दवाढ़ व्हावी या मागणीसाठी 7 दिवसापासून ग्रामस्थांनचे अमरण उपोषण
ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक..जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या मतदारसंघातील आंदोलन
Badlapur News: बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाडबदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड
कर्जत आणि मुंबई दिशेकडेल लोकल वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिराने
कर्जतकडे जात होती मालगाडी
अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना
Hingoli News: केंद्र शासनाच्या सीसीआय केंद्राकडून कापूस खरेदीला ब्रेकहिंगोली -
केंद्र शासनाच्या सीसीआय केंद्राकडून कापूस खरेदीला ब्रेक
सर्वर मध्ये तांत्रिक अडचण आल्याने मागील तीन दिवसांपासून कापूस खरेदी बंद
सोमवार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या कापसाच्या गाड्या सीसीआय केंद्रांवर उभ्याच राहणार
व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि डज गुलाबाला मागणी वाढली-नांदेड जिल्ह्यात सध्या गुलाब फुलांना मोठी मागणी वाढली असून गुलाब फुलांना चांगला दर मिळत असल्याने गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर गुलाब फुलांना मोठी मागणी वाढली आहे.फुल बाजारात शिर्डी गुलाब आणि डज गुलाबाला मोठी मागणी वाढलीय.गुलाबाला सध्या फुल बाजारात 110 ते 130 रूपये किलो दर मिळत असल्याने गुलाब उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केलय.
केंद्र शासनाच्या सीसीआय केंद्राकडून कापूस खरेदीला ब्रेकसर्वर मध्ये तांत्रिक अडचण आल्याने मागील तीन दिवसांपासून कापूस खरेदी बंद
सोमवार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या कापसाच्या गाड्या सीसीआय केंद्रांवर उभ्याच राहणार
शिरवळ एमआयडीसी परिसरात युवकाची निर्दयी हत्याशिरवळ एमआयडीसी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११:१० वाजता जुन्या वादातून २२ वर्षीय अमर शांताराम कोंढाळकर याची निर्घृण हत्या करण्यात आली. तेजस महेंद्र निगडे (वय १९) याच्यावर हत्या करण्याचा आरोप असून त्याने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिरवळ परिसरात तणावाचे वातावरण आहे.
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझाच्या डिव्हायडरला ट्रकची जोरदार धडक..अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरिल वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझाजवळ एका ट्रकने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Pune News: पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच, विश्रांतवाडीमधील कारच्या काचा फोडल्यापुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
विश्रांतवाडी हद्दीतील धानोरी येथे गाड्यांची तोडफोड
अज्ञात इसमानी पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर दगड मारून तीन वाहनांची काच फोडली आहे.
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
आरोपीं फरार असून पोलिस आरोपाचा तपास करत आहे
Pimpari Chinchwad: खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल, पुण्यात खळबळपिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधनमध्ये एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे.
यामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.
असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Beed News: खंडणी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणारबीड -
- खंडणी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार.
- खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
- केज येथील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
Pune News: पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अभाविपचामहा आक्रोश मोर्चापुणे -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अभाविपचा महा आक्रोश मोर्चा
मोर्चाला पुणे,अहील्यानगर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थितीत राहणार
६१ प्रकारच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार...
Nashik News: कानपुरमधील भोंदूबाबाला न्यायालयाचा दणका, महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी ठोठावला दंडनाशिक -
- कानपुरमधील भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचा दणका
- पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी ठोठावला दंड
- ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत
- सिडकोतील महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी घेतली होती भोंदूबाबाची मदत
- कानपुरमधील ग्राम करोली येथील लवकुश आश्रमाचे संतोष अजिंग भदोरियाला ग्राहक न्यायालयाने दिला दणका
- भूतबाधा दूर करण्यासाठी पीडित महिलेकडून अडीच लाखांची रक्कम घेत ऑनलाईन केली होती पूजा
- ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चा आधार घेऊन महिलेने घेतली होती ग्राहक न्यायालयात धाव
Rajan Salvi: राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, आज शिंदे गटात प्रवेश करणाररत्नागिरी - माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र
दुपारी 3 वाजता ठाण्यात होणार राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश
राजन साळवी यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरीतील पदाधिका-यांनी देखील दिले राजीनामे
रत्नागिरीत पदाधिका-यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का..
Buldhana News: बुलडाणा जिल्ह्यात १४ महिन्यात एसीबीच्या २५ आरोपी जाळ्यातबुलडाणा जिल्ह्यात १४ महिन्यात एसीबीच्या १८ कारवाईत २५ आरोपी जाळ्यात
सर्वाधिक लाचखोर आढळले महसूल आणि नगर प्रशासन विभागात.
बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक पदी शितल घोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत
डिसेंबर २०२३ ते आजपर्यंत या १४ महिन्याच्या कालावधीमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार १८ सापळे यशस्वी करण्यात आले आहेत
या कारवाईमध्ये २५ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे
यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आल आहे...
Ratnagiri News: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, राजन साळवींनंतर पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामेरत्नागिरी - राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरुच
राजन साळवीं पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील दिले राजीनामे
राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने युवा निरीक्षकांचा राजीनामा
राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश याने देखील दिला युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा
राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांचा सुद्धा उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांचा कुटुंब त्यांच्यासोबत
राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय साळवी पुतण्या दुर्गेश साळवी , मुलगा अथर्व साळवी हे देखील करणार शिवसेनेत प्रवेश
Pandharpur News: उन्हाळाच्या तोंडावर लिंबाचे भाव वाढले; आवक कमी झाल्याने दरवाढपंढरपूर -
- उन्हाळाच्या तोंडावर लिंबाचे भाव वाढले; आवक कमी झाल्याने दरवाढ
- फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
- तापनात देखील वाढ होऊ लागली आहे. अशातच आता लिंबाचे दर वाढले आहेत. त्यातच लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.
- एरवी किरकोळ बाजारात दोन रुपयांनाा मिळणारे लिंबू आता सात ते दहा रुपयांना विकले जात आहे.
Amravati News: जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे प्रकरण, ८ जणांविरोधात गुन्हे दाखलअमरावती -
- जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे प्रकरण
- अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथे आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
- मालेगाव, अकोलानंतर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे गुन्हा
- आठ जणांची चौकशी अंती खात्री पटल्याने गुन्हे दाखल
- जन्म दाखल्यासाठी बनावट कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Sambhajinagar News: हर्षवर्धन जाधव पुढची निवडणूक लढवणार, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरलहर्षवर्धन जाधव पुढची निवडणूक लढवणार
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मी निवडणूक लढवणार आणि राजकारणाच्या मैदानात येणार असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर यापूढे विधानसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.
कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांनी त्यांचा पराभव करून आमदार झाल्या आहेत.
मात्र आता 2029 ची निवडणूक मी लढणार मतदारसंघाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक लढावी लागणार असल्याचे सांगितले.
Nashik News: बारावीच्या परीक्षेदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाईनाशिक -
- बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉलेज रोड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
- टवाळखोरी आणि उपद्रव करणाऱ्या ६९ टवाळखोरांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद
- बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांच्या टवाळखोरी विरोधी पथकाची कारवाई
- टवाळखोरांवर कारवाई करण्याबरोबरच रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
- स्टॉप अँड सर्च मोहिमेत ११२, ट्रिपल सीट १३, विना कागदपत्रं ६ आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या ४ जणांकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल
Kolhapur News: कोल्हापूरात गर्भलिंग निदान करणाऱ्या दवाखान्यावर छापाकोल्हापूर - गर्भलिंग निदान करणाऱ्या दवाखान्यावर कळंब्यात छापा
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने टाकला छापा
डॉक्टर दिपाली ताईगडे ताब्यात
तर वरणगे पाडळीत गर्भवताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघी ताब्यात
रोख रकमेसह गर्भवताच्या गोळ्यांचे 5 पाकीट केली जप्त
Nagpur News: हैदराबादमध्ये दागिने आणि विदेश चलन चोरी करणाऱ्या तिघांना नागपुरातून अटकनागपूर -
- हैदराबाद येथून दागिने रोख रक्कम आणि विदेशी चलन चोरी करून पळ काढणाऱ्या तिघांना नागपुरात अटक
- रेल्वे सुरक्षादल आणि गुन्हे शाखेने तेलंगणा एक्सप्रेस मध्ये आरोपींना काटोल रेल्वे स्थानकावर अटक करून 1 कोटी 55 लाख 18 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय..
- शील मुखिया, मलहू सोनाय, बसंती आर्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत..
- 11 फेब्रुवारी रोजी आरोपी चोरी करून तेलंगणा एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाला दिली होती..