Arjun Kapoor : अर्जुन कपूरचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अर्जुन चित्रपटाचे जोमाने प्रमोशन करत आहे. आता तो इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर या शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये मलायका अरोरा जज आहे. शो दरम्यान, स्पर्धक मलायकाला स्टेजवर घेऊन जातात आणि ती तिच्या नृत्यशैलीने सर्वांना आश्चर्यचकित करते.
मलायकाचे कौतुक करताना अर्जुन म्हणतो, मी अनेक वर्षांपासून तिला पाहून नेहमी अवाक होतो.मी अजूनही गप्पच आहे. पण मी एवढेच सांगू इच्छितो की माझ्या आवडत गाणं इथे सादर झालं आणि त्यावर मलायकाचा सुंदर असा डान्स पाहायला मिळाला त्यामुळे मी खूप खुश आहे.
अर्जुन पुढे म्हणतो, ज्या प्रकारचे या डान्सचे सादरीकरण झाले ते मनाला भिडणारे होते. अभिनंदन मलायका, तुला माहिती आहे मला ही गाणी किती आवडतात. त्यामुळे मी फार एन्जॉय केलं. यावर प्रतिउत्तर देत मलायका म्हणते खूप खूप धन्यवाद.
ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच आणि च्या नात्याबद्दल सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. लवकरच अर्जुनाचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरची महत्वाची भूमिका आहे.