पुण्यातील कोथरूडमध्ये अचानक ४७ डुकरांचा मृत्यू झाला. डुकरांच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. एकापाठोपाठ एक डुकरांचे मृत्यू होत आहे. या डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यामागचे कारण समोर आले आहे. काविळमुळे डुकरांचा मृत्यू झाला आहे. मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्यात आले त्यातून ही माहिती समोर आली आहे.
कोथरूडमध्ये मृत पावलेल्या डुकरांचा अहवाल प्राप्त झाला आहे. काविळने या डुकरांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता ७६ डुकरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोथरूड येथे आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून डुकरे मरत आहेत. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. मृत डुक्कर सापडे असता त्याच्या शवविच्छेदनातून काविळ सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आहेत.
मृत डुकरांचे अवयव भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महापालिकेने एका दिवसांत ७६ डुकरांना पकडून निरीक्षणात ठेवले असून २ दिवसांनी त्यांना कत्तलखान्यात पाठवले जाणार आहे. दरम्यान, कोथरूडमध्ये डुकरांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. रोज कोथरूडमध्ये डुक्कर मृतावस्थेत सापडत आहेत. पुणे महापालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठले होते.
कोथरूड पीएमपी डेपो येथील भारतीनगर तेथील नाल्यामध्ये गेल्या १० दिवसांपासून मृत डुकरे सापडत आहेत. महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. तक्रार केल्यानंतर ही डुकरे उचलून नेण्यात आली आहेत. सातत्याने या परिसरात मृत डुकरे सापडत असल्याने याचे नेमके कारण काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे