देशाचे पंतप्रधान मोदी अमेरिकेत पोहोचले असून हा त्यांचा अधिकृत दहावा दौरा आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा पहिलाच दौरा आहे
अमेरिकेत पोहोचल्यानंतर, मोदींनी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालिक तुलसी गबार्ड यांची भेट घेतली.
राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे प्रभारी असलेल्या तुलसी गबार्ड या लष्करी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांनी याआधी इराक आणि कुवेतमध्ये काम केले असून अमेरिकेतील हिंदूंचे प्रश्नांवर काम केले आहे.
तुलसी गबार्ड स्वतःला हिंदू मानतात. त्या भारतीय वंशाच्या नाहीत. पण त्यांच्या आई कॅरोल यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. तर वडील रोमन कॅथोलिक ख्रिश्चन होते.
2022 मध्ये तुलसी गबार्ड यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला राम राम ठोकला होता. त्या रिपब्लिकन पक्षात सामील झाल्या होत्या.
अमेरिकेतील राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी कमला हॅरिस यांचा पराभव करण्यासाठी ट्रम्प यांनी तुलसीची मदतही मागितली होती.