Who will be the new captain of RCB in IPL 2025? २०२५ ला २१ मार्चपासून सुरूवात होणार आहे आणि त्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. यंदाच्या पर्वात सर्वच संघांमध्ये बरेच बदल झाल्याने, कोणाची कामगिरी कशी होते, याची उत्सुकता आहेच. पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर आणि लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंत यांची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. आज च्या ( RCB) नव्या कर्णधाराची घोषणा होणार आहे, परंतु या शर्यतीत विराट कोहलीचे ( Virat Kohli) नाव नसल्याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
विराटने २०१३ ते २०२१ पर्यंत फ्रँचायझीचे नेतृत्व केले होते आणि आयपीएल २०२३ मध्ये तीन सामन्यांसाठी कर्णधारही होता.त्याच्या नेतृत्वाखाली फ्रँचायझीने २०१६ मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडकही दिली होती.आयपीएल २०२५च्या ऑक्शनपूर्वी विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी) आणि यश दयाल (५ कोटी) या तिघांना कायम ठेवले होते. त्यामुळे विराटकडे नेतृत्व सोपवले जाईल, अशी शक्यता अशी वर्तवली जात होती. पण, आता हाती आलेल्या माहितीनुसार फ्रँचायझीने दोन पर्याय आणखी ठेवले आहेत. रजत पाटीदार व कृणाल पांड्या असे दोन खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.
मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार हाही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. तो २०२१ पासून RCBसोबत आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मोठ्या लिलावापूर्वी त्यांच्या तीन राखलेल्या खेळाडूंपैकी एक होता. ३१ वर्षीय पाटीदार यांनी २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश राज्य संघाचे नेतृत्व केले होते. २०२२ ते २०२४ पर्यंत तीन वर्षे संघाचे नेतृत्व करणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला संघात न ठेवल्यानंतर RCB ला नवीन कर्णधाराची आवश्यकता आहे.
२०२१ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद नऊ हंगामात संपवणाऱ्या कोहलीकडून ड्यू प्लेसिसने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली.कोहलीने आयपीएलमध्ये १४३ सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आणि त्यात ६८ विजय, ७० पराभव आणि चार अनिर्णित असा निकाल पाहायला मिळाला आहे. RCBला अद्याप आयपीएल जिंकता आलेले नाही, परंतु कोहलीने २०१६ मध्ये त्यांना अंतिम फेरीत नेले होते आणि त्या हंगामात त्याने विक्रमी ९७३ धावा केल्या होत्या. तो आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक ७४१ धावा करणारा खेळाडू होता आणि आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लिलावातून घेतलेले खेळाडू - जोश हेजलवूड (१२.५० कोटी), फिल सॉल्ट (११.५० कोटी), जितेश शर्मा (११ कोटी), लियाम लिव्हिंगस्टोन (८.७५ कोटी), रसिक दार (६ कोटी), सुयश शर्मा (२.६० कोटी), भुवनेश्वर कुमार (१०.७५ कोटी), रसिख दार (६ कोटी), कृणाल पांड्या (५.७५ कोटी), टीम डेव्हिड (३ कोटी), जेकॉब बेखेल (२.६० कोटी), देवदत्त पडिक्कल (२ कोटी), नुवान तुषारा (१.६० कोटी), रोमरियो शेफर्ड (१.५० कोटी),लुंगी एन्गिडी (१ कोटी), स्वप्नील सिंग (५० लाख RTM), मोहित राठी (३० लाख), अभिनंदन सिंग (३० लाख), स्वस्तिक चिकारा (३० लाख), मनोज भांडगे (३० लाख)