WPL 2025, MI vs RCB : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सने जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग की बॉलिंग?
GH News February 21, 2025 10:11 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्सने दोन पैकी एका सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वुमन्स प्रीमियरल लीगच्या पहिल्या पर्वात मुंबईने, तर दुसऱ्या पर्वात बंगळुरुने बाजी मारली होती. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टरमुळे आतापर्यंत या स्पर्धेत असाच ट्रेंड चालत आला आहे. नाणेफेक जिंकली की गोलंदाजी स्वीकारायची आणि दिलेला स्कोअर गाठायचा.

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही पाहिले आहे की पहिले सहा षटके गोलंदाजीसाठी चांगली आहेत म्हणून आम्ही पाठलाग करणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही बंगळुरूमध्ये खूप मजा केली आणि आम्ही पुन्हा त्याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याच अकरा खेळाडूंसह जात आहोत.’

आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं की, परत येऊन अशा प्रकारचे स्वागत होणं चांगले आहे. मला वाटते की संघासाठी चाहते असणे हे खूप मोठे आहे, आम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही जे काही करतो ते आम्ही त्यांच्यासाठी करतो. सर्व मुलींना खरोखर अभिमान आहे, आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु आम्हाला माहित आहे की क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे आम्ही शून्यापासून सुरुवात करतो आणि उत्साहित असतो. ते एक चांगले खेळपट्टी दिसते, वडोदरामध्ये भरपूर दव पडला होता पण बंगळुरूमध्ये जास्त दव पडणार नाही. मला येथे प्रथम फलंदाजी करण्यास हरकत नाही. आम्ही त्याच अकरा खेळाडूंसह जात आहोत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका सिंग ठाकूर.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.