SA vs AFG Live : भारतीय खेळाडूला हटवून पाकिस्तानीला मेंटॉर बनवला, अफगाणिस्तानचा निम्मा संघ ८९ धावांत तंबूत परतला; दिग्गज डेल स्टेन म्हणाला...
esakal February 22, 2025 01:45 PM

Younis Khan is Afghanistan's mentor and batting consultant :ने त्यांच्या पहिल्या लढतीत विजय जवळपास पक्का केला आहे. अफगाणिस्तानच्या संघाची ३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमछाक झालेली दिसतेय आणि त्यांचा निम्मा संघ ८९ धावांत तंबूत परतला आहे. ने या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मेंटॉर व फलंदाज सल्लागार म्हणून पाकिस्तानच्या माजी खेळाडूची नियुक्ती केली आहे. यापूर्वी २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा माजी फलंदाज अजय जडेजा अफगाणिस्तानचा मेंटॉर होता. पण, त्याला डावलून अफगाणिस्तानने यंदा युनूस खानची निवड केली आणि त्यांची परिस्थिती पाहून नेटिझन्सनी खिल्ली उडवली.

दक्षिण आफ्रिकेने ३१६ धावांचे आव्हान ठेवले होते. टॉनी डी जॉर्झी ( ११) स्वस्तात बाद झाल्यानंतर रिकेल्टन व कर्णधार बवुमा यांनी १२९ धावांची भागीदारी केली. बवुमा ७६ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावांवर बाद झाला. रायनने १०१ चेंडूंत शतक पूर्ण केले. पण, पुढच्याच षटकात तो रन आऊट झाला. रिक्लेटन १०६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह १०३ धावा करू माघारी परतला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने ४६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा केल्या. त्यापाठोपाठ एडन मार्करमने ३६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या. आफ्रिकेने ५० षटकांत ६ बाद ३१५ धावा केल्या.

अफगाणिस्तानला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. रहमनुल्लाह गुरबाज ( १०) व इब्राहिम झाद्रान ( १७) हे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे लुंगी एनगिडी व कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाले. १४ व्या षटकात सेदीकुल्लाह अटल ( १६) रन आऊट झाल्याने अफगाणिस्तानची अवस्था ३ बाद ५० धावा अशी झाली. वियान मुल्डरचे तीन डॉट बॉल खाल्ल्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आक्रमक फटका मारायला गेला अन् बवुमाने अचूक झेप घेत झेल टिपला.

अझमतुल्लाह ओमारजाई ( १८) चांगला खेळत होता, परंतु रबाडाने त्याला माघारी पाठवून अफगाणिस्तानला ८९ धावांवर पाचवा धक्का दिला. अफगाणिस्तानला विजयासाठी २४.४ षटकांत २१३ धावा करायच्या आहेत आणि रहमत शाह व मोहम्मद नबी मैदानावर उभे आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन म्हणाला, "अँड्रू पुटिक अफगाणिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. पुटिकसाठी युनुस खानसारखा दिग्गज सोबत असणे ही मोठी गोष्ट आहे. तो युनुस खानकडून खूप काही शिकू शकतो आणि ते ज्ञान अफगाणिस्तानच्या फलंदाजांना देऊ शकतो."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.