Success Story: वाशिमच्या शेतकऱ्याची कमाल! ३ एकर शेतीत घेतलं १०० टन पपईचं उत्पन्न; १० लाखांचा निव्वळ नफा
Saam TV February 22, 2025 03:45 PM

मनोज जयस्वाल, साम टीव्ही प्रतिनिधी

शेतकरी नेहमीच शेतीत काहीतरी नवनवीन प्रयोग करत असतात. याच प्रयोगातून त्यांना यश मिळतं. वाशिमच्या शेतकऱ्यानेही शेतीत असाच एक प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. वाशिमच्या शेतकऱ्याने तीन एकर शेतीत १०० टन पपईचे उत्पादन घेतले आहे.

च्या मंगरूळपीर तालुक्यातील बालदेव येथील युवा शेतकऱ्याने तीन एकर शेतात पपईचे १०० टन उत्पन्न घेतलय, सुरुवातीला 15 त्यानंतर 18 रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने यातून त्यांना दहा लाख रुपये कमावले आहेत. अजून शेतात ३० ते ४० टन पपई शेतात शिल्लक असून, या पपईला २० रुपये ते २२ रुपये प्रति किलोला दर मिळण्याची अपेक्षा आहे, यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये मिळण्याचे अपेक्षित आहे. तीन लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना तीन एकर पपईच्या शेतात नफा दहा लाख रुपये मिळाला आहे.अनुज चेके अस युवा शेतकऱ्याच नाव आहे.

तीन एकर शेतात एकरी हजार याप्रमाणे तिन एकर शेतात तीन हजार झाडाची लागवड केली आहे. पपईच उत्पादन सुरू झाल्यानंतर तीन वेळा पपईचा तोड झाला आहे. यात सुरुवातीला पंधरा रुपये किलो दर मिळाला त्यानंतर अठरा रुपये किलोला दर मिळाला आहे..

आतापर्यंत शंभर टन पपईची विक्री झाली आहे यातून दहा लाख रुपये मिळाले आहेत. अजूनही शेतात 30 ते 40 टन पपई शेतात शिल्लक आहे. सध्या ला मागणी असल्यामुळे पपईला 20 ते 22 किलोचा दर मिळण्याची अपेक्षा आहे. असे झाले तर यातून सरासरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.