Maharashtra Politics News live : संतापजनक! महाराष्ट्र महामंडळाच्या बस चालकाला कन्नड येत नसल्याने तोंडाला फासले काळे
Sarkarnama February 22, 2025 03:45 PM
Maharashtra Karnataka dispute : कन्नडीगांचा उन्माद! चालकाला कन्नड येत नसल्याने तोंडाला फासले काळे

कन्नडीगांचा उन्माद महाराष्ट्रासाठी नवा नाही. अशातच आता कन्नडीगांनी पुन्हा धुडगूस घातला आहे. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येत नसल्याने चक्क त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय बसला देखील काळे फासलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray and Vicky Kaushal : राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि छावा सिनेमातील प्रमुख कलाकार अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर मराठी कविता वाचन करणार आहेत. शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मराठी ते कविता वाचन करणार आहेत.

Amit Shah News : अमित शाह पुण्यात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री ते पुण्यात दाखल झाले. या दौऱ्यात ते आज 11 वाजता पश्चिम गृह विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसंच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपालाही ते उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.