SSC Paper Leak : पहिल्या १५ मिनिटात मराठीचा पेपर फुटला, पोलिसांत गुन्हा दाखल, पुढे काय?
Saam TV February 22, 2025 03:45 PM

अक्षय शिंदे पाटील

SSC Marathi Exam Paper Leak : जालन्यातील बदनापूर येथील पेपरफुटी प्रकरणी मल्टीसर्विसेस चालककासह अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षणाधिकारी मंगल धूपे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathi SSC Paper Leaked in 15 Minutes: Case Filed, Investigation Underway)

जालन्यातील बदनापूर येथील पेपरफुटी प्रकरणी मल्टीसर्विसेस चालककासह एका अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिक्षणाधिकारी मंगल धूपे यांच्या फिर्यादीवरून जालन्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल सर्वप्रथम ही बातमी साम टीव्ही ने महाराष्ट्रासमोर आणली होती.सुरुवातीला बदनापूर येथे असा काही प्रकार झालाच नाही असा प्रशासनाने दावा केला होता.मात्र साम टीव्ही ने पुरविण्यानिशी बातमी समोर आणल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.आणि आता मल्टी सर्विसेस चालकासह अज्ञात आरोपींविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मल्टीसर्विसेस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी मल्टीसर्विसेस चालकाला ही प्रश्नपत्रिका कुणी पुरवली याचा शोध आता प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

उत्तर लिहिणारी व्यक्ती कोण?

बदनापूर पेपर फुटी प्रकरणी मल्टी सर्विसेस चालकासह एका अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र झेरॉक्स केंद्रचालकांना उत्तर पत्रिका तयार करून देणारी व्यक्ती कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या उत्तर पत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांकसह काही प्रश्नांची उत्तरे टाईप केली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे हस्तक्षरात आहेत .त्यामुळे उत्तर पत्रिका तयार करणारा हा व्यक्ती कोण याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे...

चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?

बदनापूर येथे उत्तरपत्रिका वाटपाची खैरात सुरू असताना असा प्रकार घडलाच नाही अशी चुकीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिली. त्यामुळे मराठीचा पेपर फुटला नाही असा दावा डॉ.पांचाळ यांनी सुरुवातीला केला होता. मात्र साम टीव्ही ने बातमी पुरविण्याची समोर आल्यानंतर काही तासानंतर वास्तव कळताच या प्रकरणाची चौकशी सुरू असून सखोल तपास केला जाईल असं डॉ.श्रीकृष्ण पांचाळ म्हणालेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे देखील पाहावं लागणार आहे..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.