धाराशिवमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपींना पळून जायला मदत केली, असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केला आहे..आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांवर मकोका लावण्याची मागणीही धस यांनी केली आहे.
Sushma Andhare : महिला आयोग बरखास्त करा - सुषमा अंधारेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. अंधारे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात ज्या महिला आयोगाचे अस्तित्व तीळ मात्र ही जाणवलं नाही. जो महिला आयोग फक्त आणि फक्त कार्पोरेट पार्ट्यांमधून वावरताना दिसला. त्याच्यावरून म्हणे महायुतीत ठिणगी पडतेय... मायाहो.. दादाहो.. महिला आयोग तिघांपैकी कुणाच्याही वाट्याला गेला तरी त्या पदावर बसणारी व्यक्ती बुद्धी, कायद्याचे ज्ञान, जनमानसात जाऊन काम करण्याची तयारी या निकषावर थोडीच बसते? हे असले आयोग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे.तो कुणाच्या वाट्याला जाईल यावर वादावादी करण्यापेक्षा सरळ आयोग बरखास्त करून टाका.
Neelam Gorhe : साडी घेतल्याशिवाय महिला शिवसैनिकांना नीलम गोऱ्हे भेटत नाहीतउद्धव ठाकरे हे मंत्रिपद देण्यासाठी नेत्यांकडून दोन मर्सिडीज गिफ्ट घेत होते, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. नीलम गोऱ्हेंच्या या दाव्याविरोधात पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर पक्षाच्या महिला शिवसैनिकांनी आंदोलन करत महागडी साडी गिफ्ट घेतल्याशिवाय नीलम गोऱ्हे या भेट देत नव्हत्या, असा आरोप केला आहे.
Neelam Gorhe : गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमकदिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे, या वक्त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे यांना सगळ्यात जास्त पद शिवसेनेनं दिली. आयत्या बिळात बसून नीलम गोऱ्हे यांनी पद मिळवली. जुन्या जाणत्या महिलांना डावलून 4 टर्म आमदार झाल्या. माझं आव्हान आहे त्यांना, त्यांनी शपथ घेऊन सांगावं की तुम्ही किती मर्सिडीज बेंझ गाड्या दिल्या? लाचारी पत्कारून कोणाला तरी सुखावण्यासाठी आरोप करायचे, अशा राजकारण्यांचा धिक्कार करतो’ असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे.
Neelam Gorhe : पुण्यातील निवासस्थानाबाहेर महिलांकडून आंदोलनपुण्यातील नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे शिवसेनेच्या महिलांकडून आंदोलन केले जात आहे. साहित्य संमेलनप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
Sushma Andhare : ज्यांना कर्तृत्व आहे, अशा लोकांशी वाद घातला पाहिजे : सुषमा अंधारेज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे, अशा लोकांशी आपण वाद घातला पाहिजे. कर्तृत्वशून्य आणि निव्वळ चापुलसी करून मर्जी संपादन करून विश्वासघाताने पद मिळविणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही, अशा शब्दांत शिसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.
Uddhav Thackeray : निष्ठावंत शिवसैनिक आजही माझ्यासोबत : उद्धव ठाकरेनिष्ठावंत शिवसैनिक आजही माझ्या सोबत आहेत, याचा मला अभिमान आहे, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अहिल्यानगर येथील काँग्रेसचे किरण काळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन3 मार्च ते 26 मार्च राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन पार पडणार आहे. यात 8 मार्च रोजी महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा होणार आहे. तर 10 तारखेला उपमुख्यंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार यांचे हे 10 वे बजेट असणार आहे. तर देशाच्या राज्यघेटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे 25 आणि 26 मार्चरोजी संविधानावर चर्चा होणार आहे.
"ही सगळी गयी गुजरी लोक" निलम गोऱ्हेंच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्तुत्तरमुंबई : निलम गोऱ्हे यांच्याबद्दल महिला म्हणून आदर आहे. मात्र राजकीयदृष्ट्या ही सगळी गयी गुजरी लोक आहेत. त्यांनी राजकारणात त्यांचं चांगभल करून घेतलं आहे. त्यांना आतापर्यंत चार वेळा आमदार केले, उपसभापती केले. मग त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? असा सवाल करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते काँग्रेस नेते किरण काळे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते.
शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं..." नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक दावाठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
निवडक महिलांना मिळणार PM मोदींच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचा अॅक्सेसआगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. काही निवडक महिलांना मोदी यांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचा अॅक्सेस दिला जाणार आहे. या महिला करत असलेले प्रेरणादायी काम जगभरात पोहोचावे असा या घोषणेमागील उद्देश असल्याचे मोदी यांनी सांगितले. मन की बात कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
Maratha Community Conference Live: मेटे, विजयसिंह महाडिक यांची उपस्थितीKolhapur News: कोल्हापुरात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय परिषद होत आहे. मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या या राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, सुभाषदादा जावळे-पाटील, राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष, दिलीपदादा जगताप, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मोरे, संभाजी बिगेडचे अध्यक्ष संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra Karnataka dispute : कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द, महाराष्ट्रातील प्रवाशांची गैरसोयकर्नाटकात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिलेत. मात्र, या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
Satara : भारताच्या लष्करात कार्यरत असणारा T 55 रणगाडा साताऱ्यातसातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच साताऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात आज T55 CAFVD रशियन मेड असणारा 38 टन वजनाचा रणगाडा लावण्यात आला आहे. यानिमित्तानेखासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय सेनेबद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. उदयनराजे यांनी 3 तास उभे राहून कामाची पाहणी केली.
Bhandara News : गणिताच्या पेपरला कॉपी करणाऱ्यावर भरारी पथकाची कारवाईभंडाऱ्यातील एकोडी येथील परीक्षा केंद्रात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारावीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकानं तपासणी केली. यावेळी विद्यार्थी कॉपी करताना आढळला. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी येथील स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : देशमुख हत्या प्रकरणाचे दिल्लीत पडसादसरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू तसंच मंत्री धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांचे पडसाद दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाडा साहित्य परिषदेने याबाबत मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत वाद झाला.मात्र, अद्याप हा ठराव स्वीकारण्यात आलेला नाही.