IND vs PAK Live Rohit Sharma Breaks Sachin's Record: Fastest Opener to 9000 ODI Runs: हिटमॅन रोहित शर्माने दुबईच्या मैदानावर दुसऱ्याच षटकात उत्तुंग षटकार खेचून चाहत्यांना आनंदित केले. शाहिन शाह आफ्रिदीचे पहिले षटक सावधपणे खेळल्यानंतर रोहितने नसीम शाहला टार्गेट केले. त्याचा एक चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईत मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. पण, पाकिस्तानी चाहत्यांच्या वाट्याला निराशा आली. भारतीय गोलंदाजांनी दुबईत पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व गाजवले. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या यांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ ४९.३ षटकांत २४१ धावाच करू शकला. हार्दिक पांड्याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देताना बाबर आझमला ( २३) माघारी पाठवले. इमाम उल हक ( १०) अक्षर पटेलच्या डायरेक्ट हिटवर रन आऊट होऊन माघारी परतला. कर्णधार मोहम्मद रिझवान व सौद शकील या जोडीच्या शतकी भागीदारीने पाकिस्तानची गाडी रुळावर आणली. पण, १५१ धावांवर पाकिस्तानला धक्का बसला.
अक्षरने रिझवानची ( ४६) विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. सौद शकिलने ६२ धावांची खेळी करून खिंड लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. खुशदीप शाहने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करताना ३८ धावा जोडल्या. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने ३, हार्दिकने २ विकेट्स घेतल्या. कुलदीपने ९-०-४०-३ अशी स्पेल टाकली. हार्दिकने २ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. हार्दिक व कुलदीप यांनी या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे २०० व ३०० विकेट्सचा टप्पा गाठला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्यात, रोहित शर्माने दुसऱ्याच षटकात खणखणीत षटकार मारत वन डे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात जलद ९००० धावा पूर्ण केल्या, आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. रोहितने २६९ वन डे सामन्यांत ४०.०१ च्या सरासरीने ११०२९ धावा केल्या आहेत. त्यात ३२ शतकं व ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीनंतर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने रचला इतिहास!वनडेमध्ये 9000 धावा पूर्ण करणारा सर्वात जलद सलामीवीर ( डावांच्या बाबतीत)
181 - रोहित शर्मा*
197 - सचिन तेंडुलकर
231 - सौरव गांगुली
246 - ख्रिस गेल
253 - अॅडम गिलख्रिस्ट
268 - सनथ जयसूर्या