Maharashtra Politics live : संजय शिरसाट यांच्याकडून राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर
Sarkarnama February 24, 2025 07:45 PM
Sanjay Shirsat News : राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर

ठाकरेंच्या शिवसेनेने मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीटं वाटली, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील दलालांनी स्वत:चं उखळ पांढरं केलं. ठाकरेंनी निष्ठावंतांना तिकीट का नाकारलं, असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी सकाळी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Maharashtra Karnataka Bus Services : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस दुसऱ्या दिवशीही बंदच!

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाजकंटकांनी एसटीच्या चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याच्या घटनेचा तणाव कायम आहे. कर्नाटकाकडे जाणाऱ्या एसटीच्या आजही बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. उमरगा स्थानकातून कलबुर्गी, बिदर या उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांना बसेस आज सलग दुसऱ्या दिवशी बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची होत होत आहेत.

Neelam Gorhe : विधानसभा निवडणुकीत नीलम गोऱ्हेंनी पैसे मागितले; नाशिकचे विनायक पांडे यांचा गंभीर आरोप

विधानसभा 2014 निवडणुकीत नीलम गोऱ्हे यांनी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप नाशिक महापालिकेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पैसे मागितले नाही. शिवसेनेने अनेक पद दिली, पण पैसे घेतले नाही. परंतु नीलम गोऱ्हे यांच्याकडून मी माझे पैसे परत घेतले, असेही विनायक पांडे यांनी म्हटले.

Maharashtra Sand Policy : वाळू धोरणासाठी येणाऱ्या काळात कडक उपाययोजना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

सर्व सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, न घाबरता महसूलचे काम करावे. त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Shivsena : शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात?

नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजच्या केलेल्या आरोपांबाबत स्वतः एकनाथ शिंदे सविस्तर बोलणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मर्सिडीज असतील तर बिलाच्या पावत्या द्या, संजय राऊत यांच्या या आव्हानाला एकनाथ शिंदे पुरावे देऊन उत्तर देणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

Santosh Deshmukh murder case : भागचंद महाराज झांजे यांनी घेतली मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबांची भेट

बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस पूर्ण झाली आहेत. गावकरी उद्या अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. वारकरी संप्रदायाच्यावतीने भागचंद झांजे महाराज यांनी मस्साजोग इथं देशमुख कुटुंब यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर शरद पवारांनी भाष्य करावं; खासदार संजय राऊत यांची मागणी

नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठाकरेंच्या शिवसेनेविषयी केलेल्या विधानावरून खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करत निषेध नोंदवला पाहिजे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

MAPMC : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज निवडणूक

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार आज होणार आहे. दुपारी दोन वाजता यासाठी बैठकी होईल. जयदत्त होळकर, प्रभू पाटील, बाळासाहेब सोळस्कर आणि सुधीर कोठारी यांची नावे चर्चेत आहेत.

Agriculture Minister Manikrao Kokate live: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज सुनावणी

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी आहे.अत्यल्प उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलीय २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपिल केले आहे. आज सत्र न्यायालयात त्यावर सुनावणी होत आहे. सत्र न्यायालयात कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की दिलासा मिळणार? हे दुपारी समजेल.

Dhananjay Munde News Update: परळीच्या कोर्टात मुंडेंवर आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील अर्जाची सुनावणी आज आहे. या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय यांनी उमेदवारी अर्जात खरी माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. मुंडे आज कोर्टात हजर राहिले नाही तर त्यांच्यावर अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, असे करुणा यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी सांगितले आहे. परळीच्या फौजदारी कोर्टात याबाबतची सुनावणी होणार आहे. परळी कोर्ट काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Met Again: ठाकरे बंधू तिसऱ्यांदा एकत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा रविवारी एकत्र आले.काही दिवसांपूर्वीच दादरमधील शिवसेना भवनाजवळ ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्यात आले होते. रविवारी अंधेरी येथे शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाचे लग्न होते. या सोहळ्यात राज-उद्धव, रश्मी ठाकरे आदींच्या गप्पा रंगल्या, हास्यविनोदात रमलेले दिसले.

Ladki Bahin Yojana live : लाडक्या बहिणींना आज मिळणार 1500 रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 1500 रुपये जमा होण्यास आज सुरूवात होईल. योजनेचा 8 वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं.

Neelam Gorhe live: पु्ण्यातील महिला शिवसैनिकांची आज मातोश्रीवर बैठक

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली लागली आहे. ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं, असा गौप्यस्फोट गोऱ्हे यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता तातडीची बैठक आहे. पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार महिला पदाधिकाऱ्यांची बैठकीस रश्मी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.