''ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं,'' असा खळबळजनक आरोप ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलाय. त्यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांनी जागोजागी आंदोलन केलं.
गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातूनही टीका करण्यात आली. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच हल्लाबोल केला. 'लायकी नसताना ४ वेळा आमदार केलं', अशा तिखट शब्दात त्यांचा समाचार घेतलाय.
लायकी नसताना ४ वेळा आमदार झालात
यांनी पत्रकार परिषेदत नीलम गोऱ्हेंवर हल्लाबोल केलाय. 'नीलम गोऱ्हे यांनी केलेलं वक्तव्य विकृती आहे. ज्या घरात तुम्ही खाल्लं, ४ वेळा आमदार झालात. मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोण बाई तुम्ही पक्षामध्ये आणली आहे? हे कुठलं ध्यान आपल्या पक्षात आणलंय. ही आपल्याला आयुष्यभर शिव्याच घालणार', असंही बाळासाहेब म्हणाले होते.
'तरी देखील काहींच्या मर्जी खातीर आल्या आणि गेल्या. ४ वेळी झाल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. त्या बाईचं विधान परिषदेतलं कर्तृत्व काय? हे जर जाणून घ्यायचं असेल तर, पुणे महानगरपालिकामधील अशोक हरनाळ हे आमचे गटनेते आहेत. त्यांची मुलाखत घ्या'.
'पुण्याचं प्लानिंग डीपी सुरू होता, तेव्हा त्यांना धमक्या देऊन या बाईने कोट्यावधी रूपये गोळा केले होते. हरनाळ यांची मुलाखत घेतल्यानंतर मग हे मर्सिडीजचं प्रकरण काय आहे, ते समोर येईल', असंही राऊत म्हणाले.
नीलम गोऱ्हेंनी किती पैसे वसूल केले?
'नाशिकच्या विनायक पांडेंना उमेदवारी देण्यासाठी गोऱ्हे या बाईने किती पैसे घेतले, हे जाऊन त्यांना विचारा. नीलम गोऱ्हे या बाईने आतापर्यंत किती लोकांकडून पैसे वसूल केलं, हे विनायक आणि अशोक यांची मुलाखत घेतल्यानंतर समजेल. तुम्हाला दोन दिवसात आणखी नावे देईन', असा खुलासाही राऊत यांनी केला आहे.